आयुर्वेदामध्ये मनुक्याला महत्वाचे स्थान दिलेले आहे.निरोगी आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी नेहमी ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामधीलच एक म्हणजे मनुका मनुका हा सर्वांच्या अवडतीचा पदार्थ आहे.वर्षातील प्रत्येक ऋतूमध्ये मनुके खाणे फायदेशीर ठरते.मनुके हे द्राक्षे सुकवून त्यापासून तयार केली जातात.
मनुके खाण्याचे आरोग्याला खूप सारे फायदे आहेत.शारीरिक समस्या आणि विविध आजारांवर मनुके अतिशय उपयुक्त ठरतात.थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर मनुक्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.रक्तशुद्धीकरणासाठी देखील मनुका हा सर्वोत्तम उपाय आहे.
आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपुर प्रमाणात औषधीय गुण आहेत.प्रत्येकाने नियमितपणे ४-५ मनुके खायलाच पाहिजे. मनुका हे सर्दी-खोकला आणि कफ हे आजार दूर करण्यासाठी सर्वात उत्तम औषध आहे.मनुक्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स बर्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरते.
चला तर आज आपण जाणून घेऊया नियमित मनुका खाण्याचे काय फायदे आहेत…
१) पोटदुखी पासून आराम : मनुके पोटाच्या संबंधित असणाऱ्या आजारांवर उपायकारक आहे.मनुक्यामध्ये असणारे फायबर पोटदुखी आणि जुलाब यावर उपयुक्त ठरते.मनुके आणि दूध मिक्स करून पिल्यास आराम मिळतो.
२) पित्त दूर होते : मनुक्याचे सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो आणि दाहकता कमी करण्यासाठी देखील मनुके उपयुक्त ठरतात.५ ते १० मनुके पाण्यात भिजवून नंतर खावेत.
३) रक्तदाब नियंत्रणात राहतो : संशोधनानुसार मनुके खाल्ल्याने रक्तामधील नायट्रिक ऍसिड चे प्रमाण वाढते आणि तसेच रक्तदाबाचा त्रास असल्यास देखील मनुके फायदेशीर ठरतात.रात्री ५ ते ६ मनुके पाण्यात भिजू घालावीत सकाळी ते पाणी आणि मनुके खावेत असे आठवड्यातून दोनदा केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४) हिमोग्लोबिन वाढते : मनुक्यामध्ये लोह आणि खनिज भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.महिलांसाठी मनुके खाणे खूप फायदेशीर आहे.नियमित भिजवलेली मनुके खाल्यास एनेमिया सारखा आजार होत नाही.
५) त्वचेसंबंधीत आजारांवर फायदेमंद : मनुक्यामध्ये अँटी ऑक्सिडंट भरपुर प्रमाणात असल्यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास होते आणि चेहरा टवटवीत दिसतो.तसेच आपण फेस पॅक म्हणून देखील मनुक्याचा वापर करू शकतो.मनुक्याची पेस्ट तयार करून त्यामध्ये १ चमचा मध मिक्स करावा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी फरक जाणवतो.
६) दात मजबूत राहतात : नियमित मनुक्याचे सेवन केल्यास दातांसंबंधीत असणाऱ्या समस्या दूर होतात.मनुके खाणे हे दातांसाठी अत्यंत गुणकारी आहे.मनुक्यामध्ये फायटोकेमिकल असल्यामुळे दात मजबूत होण्यासाठी मदत होते.मनुके खाल्ल्यामुळे दात किडत नाही,हिरड्यांना त्रास होत नाही आणि दातांचे सोंदर्य टिकून राहते.
७) हार्ट अटॅक आणि कॅन्सरवर उपायकारक : मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने हार्ट अटॅक ची समस्या असणाऱ्या रुग्णांनी मनुक्याचे सेवन करावे.आणि तसेच या मध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून बचाव होतो.
८) सांधेदुखीपासुन आराम : मनुक्यामध्ये बोरॉन हा घटक असल्यामुळे सांधेदुखी असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे मनुक्याचे सेवन करावे आराम मिळतो आणि तसेच या मध्ये कॅल्शिअम असल्यामुळे जॉईंट पेनच्या समस्या पासून बचाव होतो.

९) सर्दी-खोकला दूर होतो : मनुक्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात त्यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो तसेच यामध्ये बीटा कॅरोटीन असल्यामूळे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
१०) हायपरटेंशनपासुन सुटका : मनुक्याचे नियमित सेवन केल्यास हायपरटेंशन सारख्या समस्या पासून आराम मिळतो आणि वजन वाढवायचे असेल तर मनुक्याचा डायट मध्ये समावेश करावा.वजन आणि एनर्जी वाढण्यास मदत होते.