Home » जेवणात चुकूनही घेऊ नका वरुन मीठ, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!
Uncategorized

जेवणात चुकूनही घेऊ नका वरुन मीठ, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!

एखादा पदार्थ भरपूर मसाला, तेल तूप वापरून बनवला तरी मीठाशिवाय या पदार्थाला चव येऊ शकत नाही. मीठ पदार्थाला स्वाद देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच उपयुक्त आहे मात्र कोणताही अन्नघटक योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्यांचा शरीराला फायदा होतो अन्यथा त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. मीठसुद्धा प्रमाणात सेवन केले तर यामध्ये असलेल्या सोडियम व क्लोराईड या घटकांचा शरीराला फायदा होतो मात्र जर अति प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.

काही व्यक्तींना आपल्या आहारात जास्त मीठ सेवन करण्याची सवय असते.अनेकदा पदार्थामध्ये मीठ कमी पडले म्हणून पुन्हा मीठ घालून मग तोक्षपदार्थ खाल्ला जातो. यामुळे जेवणाला तात्पुरती चव येते मात्र यांचे दीर्घ कालीन परिणाम निश्चितच घातक आहेत.

मीठाचे अती सेवन केल्याने उतारवयात उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. तसेच मीठाचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊन शरीरात डिहायड्रेशन होते. काही परिस्थितीत उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात.

मीठामध्ये असलेल्या सोडियम मूळे रक्तवाहिन्या खडक होऊ शकतात तसेच चेह-यावर अकाली वृद्धत्व येऊ शकते. चेह-यावर निस्तेज पणा व सुरकुत्या दिसू लागतात.

मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे उद्भवणा-या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात मीठाचा वापर करावा.जेवणात पुन्हा मीठ घालणे शक्यतो टाळावे. आहारात सैंधव मीठ वापरावे.