Home » त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर असलेले फेसपॅक…  
Uncategorized

त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर असलेले फेसपॅक…  

पुरातन काळापासून हळदीला खुप महत्व दिलेले आहे.आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्व दिले जाते.त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हळद एक गुणकारी औषध देखील आहे. हळदीच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून हळदीचा औषधांमध्ये उपयोग केला जातो.आपण हळदीचा उपयोग किचन मध्ये तर करतोच पण त्याच बरोबर हळदीचा उपयोग त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे.तर आज आम्ही तुम्हाला असे काही हळदीचे लेप सांगणार आहोत. जे कि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणतील आणि चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत करतील. आयुर्वेदात प्राचीन काळापासून हळदीला खूप महत्व दिलेले आहे.वेगवेगळ्या पदार्थामध्ये हळद मिक्स करुन त्यापासून बनवलेले फेसपॅक त्वचेसाठी खुप फायदेशीर ठरतात तर चला पाहुया त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी हळद कशी वापरतात. 

१) हळद आणि बेसन पीठ : १/२ चमचा हळद १ चमचा बेसन पीठ आणि १ चमचा दूध याचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.असे नियमित केल्यावर तुमचा चेहरा फ्रेश दिसेल तसेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी देखील मदत होल. 

२) हळद आणि मध : २ चमचा हळद भाजून घ्यायची तिचा तपकिरी कलर झाल्यावर त्यामध्ये १ चमचा मध घेऊन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यावर देखील ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड जाण्यासाठी मदत होईल. 

३) हळद आणि कोरफड : १/२ चमचा हळद आणि १ चमचा कोरफडीचा गर मिक्स करून याचा लेप चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावर ग्लो येईल आणि त्याच बरोबर पिंपल्स आणि मुरूम जाण्यासाठी मदत होईल. 

४) हळद आणि टोमॅटो :  १ टोमॅटो घेऊन त्याचे दोन भाग करायचे त्या नंतर टोमॅटोला हळद लावून चेहऱ्यावर मसाज करून १० ते १५ मिनिटांनी चेहरा  कोमट पाण्याने धुवून काढा. टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन  अ आणि क असत. त्यामुळे त्वचा सुंदर आणि निरोगी राहते तसेच त्वचेवरील डाग कमी होण्यास देखील मदत होते. टोमॅटो मध्ये सायट्रिक ऍसिड असतं ते आपल्या स्किन ला ब्राईट बनवण्याचं काम करतं.

 ५) हळद आणि दूध : हळद आणि दूध याचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. १० ते १५ मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर मसाज करून चेहरा थंड पाण्याने धुवा