Home » हे आहे जगातील सर्वात महागडे मशरुम…ज्याची मार्केटमध्ये किंमत आहे 30,000 रुपये प्रतिकिलो…
Uncategorized

हे आहे जगातील सर्वात महागडे मशरुम…ज्याची मार्केटमध्ये किंमत आहे 30,000 रुपये प्रतिकिलो…

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत परंतु हे जगातील सर्वात महागडे मशरूम आहे.याची किंमत आहे हजारोमध्ये.गुच्छी मशरूम हे जगातील सर्वात महागडे मशरूम आहे.तसेच या मशरूम मध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहे.जे आपल्याला बऱ्याच आजारापासून दूर ठेवते.बऱ्याच जणांना मशरूम आवडत असतील काही जणांना आवडतनसेल परंतु मशरूम खाण्यास नकार देतात त्यांनी एकदा याचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घ्या.

मशरूम ची चव जशी रुचकर आहे तितकेच ते फायदेशीरही आहे.आज आपण जगातील सर्वात महागड्या मशरूम बद्दल माहिती बघणार आहोत.या मशरूम चे नाव गुच्छी असे आहे.हे मशरूम अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे.या मशरूम चे वैज्ञानिक नाव मार्क्युला पलायन हे आहे.

हे मशरूम स्पंज मशरूम म्हणून देखील ओळखले जाते.हे मशरूम चवीच्या बाबतीत अतिशय अतुलनीय आहे.गुच्छी मशरूम हिमालय प्रदेशातील चंबा,शिमला,कुल्लू,मनाली यासह अनेक जिल्ह्याच्या जंगलात प्रामुख्याने डोंगराळ भागात आढळते.

या मशरूम मध्ये व्हिटॅमिन-बी,व्हिटॅमिन-डीआणि काही अमिनो ऍसिड आढळतात.या मशरूम चे सेवन केल्यास हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.या मशरूम मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.मशरूम च्या या गुणधर्मांमुळे या मशरूमला भारतातच नव्हे तर यूरोप,अमेरिका,फ्रान्स,इटली आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे.

हे मशरूम खुप मौल्यवान आहे.बाजारात हे मशरूम 30,000 रुपये प्रति किलोने विकते.मोठमोठ्या कंपन्या आणि हॉटेल्समध्ये या मशरूम ला खुप मागणी आहे.हे मशरूम केवळ उंच डोंगराळ भागात आढळते त्यामुळे हे खुप महाग आहे.तुम्हाला सांगु इच्छितो की जेव्हा पर्वतावर बर्फ वितळतो तेव्हाच हे मशरूम वाढते.या मशरूम चे उत्पादन तेव्हाच होते जेव्हा पर्वतावर पडणाऱ्या विजेच्या फ्लॅशमुळे होते.

या मौल्यवान मशरूम च्या शोधात अनेक गावकरी शिमला व आजूबाजूच्या डोंगराळ भागात जातात.परंतु हे मशरूम सापडणे एवढे सोपे नाही.या मशरूम चा शोध घेण्यासाठी तेज नजर आणि खुप मेहनत लागते.या भागातील बरेचसे गावकरी सकाळपासूनच या मशरूम च्या शोधात असतात आणि या भागातील लोक आतुरतेने गुच्छी हंगामाची वाटपाहत असतात.

हे मशरूम नैसर्गिकरित्या फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात आढळतात.या मशरूमचा बऱ्याच रोगांच्या उपचारासाठी वापर केला जातो.तर आज आपण मशरूम खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते बघणार आहोत…

१) मशरूम मध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी हे मशरूम अत्यंत फायदेशीर आहे.

२) मशरूम मध्ये कॅलरीज असल्यामुळे जे लोक लठ्ठपणा कंटाळले असतील त्यांनी या मशरूम चे सेवन केले तर यामुळे वजन कमी होते.

३) मधुमेह,हृदयरोग आणि रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीसाठी मशरूम उपयुक्त आहे.मशरूम मध्ये ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक असतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी मशरूम चे सेवन करावे.

४) मशरूम मध्ये तंतुमय पदार्थ आणि फॉलिक ऍसिड असल्यामुळे मशरूम खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.

५) स्कर्व्ही आजारापासून बचाव करते आणि तसेच किडनी संबंधित असणाऱ्या आजारांवर देखील उपयुक्त ठरते.