पोहे खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यावर, तुम्ही यापुढे कधीही पोह्यांना नाही म्हणणार नाही…!

पोहे हा एक पारंपारिक भारतीय नाश्ता आहे आणि अजूनही भारतीय घरांमध्ये त्याला पसंती दिली जाते.

1. पोहे हे पचनासाठी हलके असतात त्यामुळे पचन क्रियेवर जाण येत नाही व पोट भरल्याची भावना निर्माण होते.

2. पोह्यांमध्ये तंतूजन्य पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते यामुळे शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण व साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साहाय्य मिळते.

3. पोह्यामध्ये लोहाचे प्रमाण सुद्धा जास्त असते असेच म्हटले जाते म्हणून बाळांना स्तनपान करणाऱ्या महिला व गर्भवती महिलांना भिजवलेले पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो यामुळे काही काळापुरता निर्माण होणारा ॲनिमिया दूर होतो.

4. पोह्यांमध्ये 70% पेक्षा अधिक चांगले कर्बोदके असतात. त्यामुळे शरीराला विविध कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा त्वरित निर्माण होते.

5. पोह्यांमधील गुणधर्म हे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

6. पोह्यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.एक वाटीभर पोह्यामध्ये फक्त 250 ग्रॅम इतक्या कॅलरीज असतात.

पोह्यामध्ये विविध प्रकारच्या अँटिऑक्सिडेंट व चांगले घटक असतात. पोह्यामध्ये जर शेंगदाणे घातले तर निश्चितच पोह्यांमधील कॅलरीज वाढतात

मात्र जर तुम्ही वजन घटवण्याच्या प्रयत्नात असाल तर पोह्यांमध्ये शेंगदाणे घालणे टाळावे.