तुळशी विवाहामुळे घरातील मुलामुलींच्या लग्नात येणारे अडथळे होतात दूर…

तुळशी विवाह कसा करावा याचे काही नियम आहेत.

१) तुळशी विवाह करण्यापूर्वी शुचिर्भूत  होणे खूप आवश्‍यक असते.

२) ज्या व्यक्तींना तुळशीविवाह मध्ये कन्यादान करायचे आहे त्यांनी या दिवशी उपवास करावा.

३) तुळशी पूजा करताना अंगणामध्ये तुळशीचे रोप स्थापन करावे.छतावर किंवा देव्हा-यात तुळशी विवाह केला तरी चालतो.

४) शालिग्राम ची  स्थापना करावी व शालिग्रामच्या उजव्या बाजूला तुळशीच्या  रोपाची स्थापना करावी. तुळशीच्या पुढे रांगोळी काढावी.

५) शालिग्रामला चंदनाचे गंध तर तुळशीला लाल गंध लावावे.तुळशीला एखाद्या नववधूप्रमाणे सजवावे.तुळशीच्या रोपामध्ये बांगड्या व अन्य सौभाग्यलेणे अर्पण करावीत.

६) तुळशी व शालिग्रामच्या वर उसाच्या वाढ्यांनी मंडपाची स्थापना करावी.त्यावर लाल वस्त्र टाकावे.

७) घरातील पुरुषांनी शालिग्राम ला घेऊन सात वेळा प्रदक्षिणा करावी व त्यानंतर मंगलाष्टके म्हणून विवाह विधी संपन्न करावा.

तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.