fbpx
aarey jungle

कुणी बोट कापून रत्न जडीत अंगठी विकत घेतं का ?

aarey jungle
aarey jungle

सध्या आरेमध्ये मंजूर झालेल्या मेट्रो शेडच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून प्रदर्शने करतायेत, त्यात सिने सृष्टीतील कलाकार देखील अग्रेसर आहेत. असणारच ना,मुंबईत मुंगीला देखील शिरायला जागा उरली नाहीये त्यात आरेच असं जंगले आहे जिथे वृक्ष आहेत, त्यामुळे काही प्रमाणात का होईना मुंबईकरांना शुद्ध हवेचा आनंद लुटता येतो.

मेट्रो शेड बनवणे म्हणजे प्रगतीकडे वाटचाल आहेच हो, परंतु त्यात झाडांचा का जीव घ्यायचा? जे कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याला लागणारा जीवनावश्यक ऑक्सिजन पुरवतात त्यांचाच आपण जीव घ्यायचा हे बरोबर नाही. झाडांना बोलता आलं, असतं तर मानवाच्या जीवनात त्यांची काय किंमत आहे ते त्यांनी सांगितलं असतं. तेव्हा गेले असते का झाडं कापायला, सांगा ना गेले असते का? राजकारण बाजूला ठेऊन जरा पर्यावरणाचा ही विचार करावा. तिथं असलेल्या वन्यजीवांचाही विचार करावा. तेवढी झाडं कापून नवी झाडं लावणार म्हणे. वर्षानुवर्ष तेथे वाढलेल्या त्या झाडांना कापून नवीन मेट्रो शेड बांधणं म्हणजे स्वतःच बोट कापून रत्न जडीत अंगठी विकत घेण्यासारखं…

नेहमीच डोक्याने विचार करणाऱ्यांनो कधीतरी मनाने विचार करा. तुम्हाला तुमचे उत्तर नकीच मिळेल.