fbpx

तंदुरुस्त राहायचे असेल तर फळांचे सेवन केलेच पाहिजे

सर्वसाधारणपणे असा समज असतो की आजारी पडल्यावरच फळे खायची असतात. प्रत्यक्षात मात्र फळांमध्ये इतके विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की निरोगी राहायचे असेल तर फळांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात

१. केळी
केळी हे सर्वांचे आवडते फळ आहे. या फळामध्ये अनेक गुण असतात. व्हिटॅमिनने भरलेली केळी, अँटी-ऑक्सीडेंटसचा नॅचरल सोर्स असते. फ्रेश केळी आपल्या चेह-यावर मॅश करुन लावा मग पाहा चेहरा कसा चमकतो ते…

२.पपई
एकतर तुम्हाला पपई खुप आवडत असेल नाही तर बिलकुल आवडत नसेल. परंतु हे काहीही असले तरी यापासुन होणारे ब्युटी फायद्यांवर तुम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. पपईमध्ये नॅचरल एन्जाइम असते. पपई तुमच्या स्किनच्या डेड सेल्सला नष्ट करतो आणि चेह-यावर नैसर्गिक चमक येते. यामुळेच भारतातील अनेक ब्युटी स्पेशलीस्ट आपल्या थेरेपीमध्ये पपईचा वापर करतात. पुढील स्लाईडवर वाचा.

३ स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीची ओळख ही सर्वात जास्त आपल्या ब्युटी फायद्यामुळे आहे. व्हिटॅमिन सी, सिलीकॉनिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सीडेंट असल्यामुळे स्ट्रॉबेरी अॅक्सफोलिटिंग फायद्यासाठीसुध्दा ओळखली जाते. ही स्किनच्या डेड स्किन नष्ट करते. यामध्ये अनेक अँटी-एजिंग प्रॉपर्टीज असतात. यासोबतच चेह-यावरील पिंपल्स नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे.

४. डाळिंब
पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर नियमितपणे चोळा, त्वचेचा रंग हलका व गुलबट होण्यास मद होईल. याचा प्रयोग ओठांवरही करावा. ओठांचा रंग सुधारण्यास मदत होईल

५. सफरचंद
मानवी आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे जतन आणि वर्धन करायचे असेल , तर रोज एक तरी सफरचंद खावे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॉस्फरस, लोह, ईथर इ. उपयुक्त द्रव्ये असतात. याच्या सालातही खूप महत्वपूर्ण क्षार असतात. त्यामुळे हे अमृताप्रमाणेच मानावे. याखेरीज यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

६. संत्रे
या फळात मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असते हे रेशदार फळ असते. याचा गर, रस, साले या सर्वांचा उपयोग सौंदर्य-वर्धनासाठी होतो. याची ताजी साल नेहमी हात, पाय, चेहरा, यावर जरा चुरडून चोळावी. त्यांना ‘क’ जीवनसत्व मिळते.

७. आंबे
आंब्यांना फळांचा राजा म्हटले जाते. या फळाचे साल चेह-यावरील डार्क स्पॉटस् कमी करते आणि चेह-याला स्लिन करते. बिट कॅरॉटिन आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे हे क्लियरिंग प्रोसेससाठी खुप फायदेशीर असते.

८. खरबूज व टरबूज
ही फळे उन्हाळ्यातच उपलब्ध असतात. व त्यांचा उपयोग उन्हाळ्याचा त्रास कमी करून गारवा देण्यासाठी होत असतो. यांच्यात जलांश अधिक प्रमाणात असतो. त्वचा जर चरचरीत व राठ वाटत असेल, तर ती नरम व्हावी यासाठी त्यावर खरबूजाचा गर चोळावा. सर्वांगावर टरबूजाची साल चोळावी. त्यामुळे त्वचा निखरून येते.