fbpx

हसताय ना हसायलाच पाहिजे….. हसा आणि फिट राहा

हसवणं’ ही एक अवघड कला समजली जाते. मात्र केवळ कलाक्षेत्राचा भाग म्हणून विनोद आणि हास्य सीमित नसून हसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. लाफ्टर ( हसणं) इज अ बेस्ट मेडिसिन,हे तर तुम्ही ऐकले असेल.
तर मग जाणून घेऊया, मनमोकळेपणाने हसण्याचे फायदे…

* आजकाल प्रत्येकाचं आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. हसण्यामुळे काही काळ हा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाच्या समस्या कमी होतात.

* हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो. हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

* सकाळी जर हास्य ध्यान योग केले तर दिवसभर आपण आनंदी राहतो. जर रात्रीच्या वेळी केले तर आपल्याला चांगली झोप लागते. हास्य योगामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.

* हसण्यामुळे शरीरातील सार्‍या नसा खेचल्या जातात. यामुळे शरीरातील रिलॅक्स पॉईंट अ‍ॅक्टिव्ह होतात. हसल्यानंतर तुम्हांला आपोआपच रिलॅक्स वाटेल.

* मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आजकाल अनेकांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकावरच ताण तणाव वाढलेला असतो. हसण्यामुळे
नकारात्मकता कमी होतो. लोकं एकत्र येऊन हसतात. हसण्यामुळे सोशल नेटवर्किंग सुधारते.

* दररोज एक तास हसण्याने 400 कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो. आजकाल बरेच हास्यक्लब देखील तणावपूर्ण
जीवनात हसण्याच्या माध्यमाने दूर करण्याचे काम करत आहे.

* हसल्याने आपली श्वसनक्षमता सुधारते. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळते. परिणामी शरीराची एनर्जी लेव्हल चांगली राहते.

*वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.