कोहिनुर हिरा कोठे आहे, त्यांचा हा भयानक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले. भारतातील सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. भारत हा एक समृद्ध देश होता . भारतात सोन्याचा धूर निघत असे असे म्हटले जात. म्हणजेच काय तर भारतात इतकी समृद्धी होती. ब्रिटिशांनी सर्वात मौल्यवान हिरा म्हणजेच कोहिनुर देखील घेऊन गेले आहेत. आज आपण या कोहिनुर हिऱ्याचा खरा मालक कोण आणि कोहिनुर हिरा सध्या कोठे आहे हे जाणून घेणार आहोत. कोहिनुर या शब्दांचा अर्थ कोह-ए-नूर ” म्हणजेचप्रकाशाचा डोंगर! म्हणजेच अद्भुत असा देखील होतो . कोहिनुर हिरा इतिहासकारांच्या मते हा हिरा भारताच्या आंध्र प्रदेशच्या कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता.

सुमारे चार हजार वर्षांपूर्वीगोलकोंडा खाण क्षेत्रातून प्राप्त झाला होता.या बरोबरच असे देखील म्हटले जाते हा हिरा आंध्रप्रदेश मधील वारंगळ, तेलंगणची देवी भद्रकाली हिच्या डाव्या डोळ्यातील हिरा आहे .श्रीकृष्णाशी निगडीत देखील एक कथा आहे. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला.

 • पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात. त्या नंतर हा हिरा अनेक ठिकाणी फिरला. यांच्याशी निगडीत अनेक कथा देखील आहेत. परंतु एकूणच इतिहास पाहिला तर लक्षात येते कोहिनुर कोणाकोणाकडे होता. इतिहासपूर्व काळ – सत्राजित, जांबुवंत, श्रीकृष्ण
 • १२ वे शतक – काकतीय राजे (प्रताप रुद्र)
 • १२९४ – माळव्याचा राजा
 • १३२३ – मोहम्मद-बिन-तुघलक
 • १५२६ – बाबर
 • १७३९ पर्यंत – मुगल सुलतान – हुमायूँ, शाहजहान, औरंगजेब
 • १७३९ – नादिर शाह
 • १७४७ – अहमदशाह अब्दाली (अफगाणिस्तान)
 • १८०३- शाह शुजा दुराणी (अफगाणिस्तान)
 • १८३९ – रणजितसिंग (पंजाब)
 • १८४९ – महाराणी व्हिक्टोरिया
 • १८४९ ते – ब्रिटिश राजघराणे
 • अशा प्रकारे कोहिनूरचा एकूणच इतिहास आहे. तो ब्रिटिशानांकडे कसा गेला हे देखील तितकेच महत्वपूर्ण आहे.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोहिनूर वर कब्जा :-
१८४९ मध्ये दुसर्‍या एंग्लो-शीख युद्धामध्ये ब्रिटीश सैन्याने राजा रणजितसिंग यांचा पराभव केला आणि राजा रणजितसिंगाचा संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतली. यानंतर हा बहुमोल कोहिनूर हिरा ब्रिटिश सरकारने लाहोरमधील ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीत हस्तांतरित केला.यानंतर, जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मौल्यवान हिरे ब्रिटनला पाठविले गेले. काही इतिहासकारांचा मते जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याची रक्षा करणार्यांनी तो हिरा गमावला , परंतु काही काळानंतर हा हिरा गुलामाद्वारे परत आला असे म्हणतात. मग नंतर 1850 मध्ये, हा चमकदार हिरा इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. यानंतर, जगातील सर्वात मोठा कोहिनूर हिरा क्रिस्टल पॅलेसमध्ये प्रदर्शित झाला होता, त्यावेळी ते सुमारे १८६ कॅरेट असल्याचे म्हटले जाते. ज्यावेळी कोहिनूर प्रदर्शित केला तेव्हा त्या काळातील इतर रत्नांच्या तुलनेत त्याच्यी चमक फारच फिकट दिसत होती.पण त्यानंतर इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने या हिऱ्याला एक नवीन आकार आणि रूप देण्याचा निर्णय घेतला.जगातील सर्वात किंमत असलेला कोहिनूर हिरा डच ज्वेलर श्री. कॅन्टर यांना १८५२ मध्ये देण्यात आला, त्यानंतर त्याने ते १०५.६ कॅरेटच्या अंडाकृती आकारात बनविला जेणेकरून तो अधिक चमकदार आणि आकर्षक बनला, हा हिरा ६ सेमी ३.२ सेमी १.३ सेमी आकाराचा करण्यात आला.यावेळेस सर्वात प्रथम कोहिनूर हिरा कापला गेला, या पूर्वी हा हिरा कधीही कापला गेला नव्हता. यानंतर कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटात सजवला. हा मुकुट ब्रिटीश महाराण्यांनी परिधान केला आहे.

इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियानंतर, कोहिनूरने भरलेला हा मुकुट क्वीन अलेक्झांडर (एडवर्ड सातवाची पत्नी) आणि नंतर क्वीन मेरी आणि एलिझाबेथ यांनी घातला होता. सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन हिरा कोहिनूर वर ब्रिटनच्या शाही कुटुंबाची मालकी आहे, जी तिची अमूल्य वारसा आहे. लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या विशाल किल्ल्यात कोहिनूरने भरलेला ताज संरक्षित आहे.

विल्यम कोकेरेरने हा विशाल किल्ला १०७८ मध्ये बनविला होता, आता ब्रिटनचे राजघराणे या किल्ल्यात राहत नाही, पण त्यामध्ये प्राचीन व मौल्यवान रत्ने, दागिने व कोहिनूर हिरा ठेवण्यात आला आहे. १५ ऑगस्ट १९७४ रोजी ब्रिटनच्या राजवटीतून देशाने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारताने ब्रिटनला कोहिनूर परत करण्याची मागणी केली. होता, परंतु ब्रिटिश सरकारने कोहिनूरवर आपला अधिकार असल्याचे सांगत हिरा देण्यास नकार दिला. केवळ भारतच नाही तर पाकिस्ताननेही कोहिनूरवर त्यांचा हक्क सांगितला होता, परंतु ब्रिटिश सरकारने पाकिस्तानची याचिका नाकारली.

कोहिनूर राणीच्या दरबारात ३ जुलै १८५० रोजी राणी व्हिक्टोरियाला बकिंगहम पॅलेस मध्ये कोहिनूर नजर करण्यात आला. पुढे राणी व्हिक्टोरियाने कोहिनूरला पैलू पाडले. पुढे कोहिनूर हा राणीच्या मुकुटात कायमचा स्थिरावला.या सर्व प्रवासात कोहिनूर १८७ कॅरेट वरून आज१०८ कॅरेटवर आला.