Actors Actress Articles Bollywood Entertainment

लग्नाच्या ८ वर्षांनंतर करिनाने हटवला ‘या’ विषयावरून पडदा :सांगितले ‘या’ कारणामुळे करावं लागलं सैफ सोबत लग्न..

saif and kareena
saif and kareena

सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि चार्मिंग कपल आहे. अमृता सिंह हिच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफ अली खान याने करीना कपूर हिच्याशी दुसरे लग्न केले होते. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांना दोन मुले असून त्यांची नावे हि सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हि त्यांच्या मुलांची नावे आहेत. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी १६ ऑक्टोबर २०१२ रोजी या दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला जवळपास ८ वर्ष होत आले असून त्यांचा मुलगा तैमूर अली खान देखील नंबर 1 स्टार किड आहे. दररोज वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर तो झळकत असतो.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यात १० व वर्षांचे अंतर असून मात्र या अंतरामुळे त्यांच्या नात्यात काहीही अडचण नसून सुखाने त्यांचा संसार सुरु आहे. आजच्या लेखात आपण करीना कपूर हिने आपण सैफ अली खान याच्याबरोबर विवाह का केला होता याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबतीत खुलासा केला होता. याबाबत या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत.

लोकांना करीनाचे लग्न सैफसोबत व्हावे असे वाटत नव्हते:-
सैफ अली खान याने अमृता सिंह हिच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर करीना कपूर हिच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यामुळे एका घटस्फोटित पुरुषाशी तिने लग्न करू नये अशी लोकांची इच्छा होती. करण जौहरच्या शो कॉफी विथ करण मध्ये करीनाने स्वत: हे उघड केले होते. या शोमध्ये करीना अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत आली होती. करिनाने शोमध्ये सांगितले की जेव्हा जेव्हा ती सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेत होती तेव्हा बर्यातच लोकांनी तिला याबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगितले होते.

करीनाने दोन मुलांच्या वडिलाशी लग्न का केले:-
करण जोहरच्या या शोमध्ये त्याने करीना कपूरला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले होते. यावेळी तिने या प्रश्नांवर उत्तर देताना सांगितले होते कि, जेव्हा मी सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला समजावून सांगितले की सैफला आधीच दोन मुले आहेत. त्याने घटस्फोट घेतलेला आहे. तुम्हाला खरोखरच त्याच्या बरोबरच लग्न करायचे आहे का. मी लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्याकडे सर्व काही होते. माझे चित्रपट देखील व्यवस्थित चालत होते. मात्र टशन या सिनेमाच्या वेळी आम्ही एकमेकांजवळ आलो. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री घट्ट झाली.

त्यानंतर आम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. त्यावेळी त्याने लग्नानंतर ती चित्रपटात काम करू इच्छित असेल तर त्याची काहीही हरकत नाहीये त्याची ही गोष्ट सुद्धा त्यावेळी मला खूप आवडली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याची मी चित्रपटात काम करण्यास कोणतीही हरकत नव्हती. त्यामुळे मी त्याच्याबरोबर भविष्याचा निर्णय घेतला.

लग्नामुळे करियर नष्ट होईल:-
यानंतर या मुलाखतीत आपल्या करिअरविषयी बोलताना तिने सांगितले कि, मी सैफ बरोबर लग्न केल्यानंतर माझे बॉलिवूड करिअर संपुष्टात येईल असे लोकांना वाटत होते. ऐकणे म्हणजे गुन्हा आहे. किंवा लग्न करणे हा गुन्हा आहे. मग मला वाटले की हे करून पाहूया . मग काय होते ते पाहूया. त्यामुळे मी आयुष्यात कुणाचेही काहीही मनावर न घेता माझ्या मनाचा निर्णय घेत सैफ बरोबर लग्न केले.
त्याचबरोबर आमच्या आधी चित्रपटसृष्टीतील लोक आपले रिलेशन लपवत असत. पण आम्ही ते कधी केले नाही. पूर्वीच्या अभिनेत्री आपल्या नात्याबद्दल काही बोलत नव्हत्या. मात्र आता आमच्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपले नाते जगासमोर मान्य करत आहेत.

सध्या कामाबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर हिने नुकतेच अंग्रेजी मीडियम या चित्रपटात दिसली होती. तिच्याबरोबर या चित्रपटात इरफान खान राधिका मदन आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी करीनाच्या अक्षय कुमारसोबत असलेला गुड न्यूज चित्रपट आला होता. करीना एक वर्षांत किमान दोन चित्रपट करते. त्याचबरोबर तिने आपल्या कारकिर्दीत आतपर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून सध्या ती आपल्या कुटुंबाबरोबर लॉकडाऊनचा काळ व्यथित करत आहे.

About the author

Being Maharashtrian