बॅक डान्सर ते एक सुपरस्टार असा होता सुशांत सिंग राजपुतचा थक्क करणार जीवनप्रवास

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. 

सुशांतचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला होता. त्याचे वडील एक सरकारी अधिकारी होते. २००० साली दिल्ली येथे त्यांचे कुटुंब स्थायिक झाले. सुशांतला चार बहिणी असून मीतू सिंह ही एक राज्यस्तरीय क्रिकेटर आहे. सुशांत लहापणीपासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होता. त्याने अनेक सरकारी व इतर नोकऱ्यांसाठी परीक्षा देखील दिल्या व तो त्यात सहज पास देखील होत असे.पटना येथील सेंट कैरेंस हायस्कूल , त्याने शालेय शिक्षणपूर्ण केले. 

कुलाची हंसराज माॅडल स्कूल  येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून  मॅकेनिकल  इंजीनियरिंग पूर्ण केले होते. सुशांत सुरवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम करत. अनेक फिल्म अवॉर्डच्या कार्यक्रमात देखील तो बॅक डान्सर म्हणून काम करायचा. एकता कपूरच्या बालाजी टेली फिम्सने त्याला ब्रेक दिला. किस देश में है मेरा दिल’ ही त्यांची पहिला टीव्ही सिरीयल होती. यामध्ये त्याने प्रीत जुनेजा हा रोल केला होता.

परंतु  बालाजीच्याच पवित्र रिश्ता  या झी टीव्हीवरील मालिकेने त्याला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. त्यातील मानव हे पात्र प्रचंड गाजले. त्यानंतर डांस रियलिटी शो ‘जरा नच के दिखा 2 आणि  झलक दिखला जा 4 हे शो देखील त्याने केले. यानंतर त्याने चित्रपटात काम करायला सुरू केले. काय पो छे  या सिनेमातून त्याने पदार्पण केले. शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला.

त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.   सुशांत सिंग राजपूत विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?  सुशांत अभ्यासात देखील खूप हुशार होता. त्याने अनेक चांगल्या परीक्षा दिल्या आणि त्याने त्या अगदी सहज रीतीने पस देखील केल्या आहेत. परंतु त्याला त्याचे करियर हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये करायचे होते म्हणून त्यांनी कोठेच नोकरी केली नाही. 

प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्याकडून सुशांतने डान्सचे धडे गिरवले आहेत.   सुशांतने २००६च्या काॅमनवेल्थ स्पर्धेमध्ये देखील डान्स केला होता. ५१ व्या फिल्मफेअर अवॉर्डशो मध्ये देखील त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते.  मुंबईत  करियरसाठी आल्यानंतर त्याने एक डान्स ग्रुप जॉईन केला. तेव्हा प्रसिद्ध कोरिओग्राफर ऐश्ले लोबो  याने त्यांच्या ग्रुपला डान्स शिकवला होता. त्यानंतर त्याने थियेटर जॉईन केले व तेथेच त्याला अभिनयाचे खूप चांगले धडे मिळाले.  जेव्हा सुशांत मुंबईत करियरसाठी आला तेव्हा त्यांचे आई -वडील खूप नाराज झाले होते. त्यांची इच्छा होती की सुशांतने चित्रपटात काम न करता एखादी चांगली नोकरी करावी.

काय पो छे चित्रपट करताना या चित्रपटाची प्रेरणा त्याला त्यांच्या बहिणीकडून म्हणजेच मीतू सिंह हिच्याकडून मिळाली होती.  ती एक राज्यस्तरीय क्रिकेटर आहे. एक काळ असा होता की बॉलीवूडमधील एकही आघाडीची अभिनेत्री सुशांतसोबत काम करायला तयार नव्हती कारण तो एका सामान्य घरातून आलेला मुलगा होता त्यामुळे. शुद्ध देशी रोमान्समध्ये शेवटी परिणीती चोपडासोबत त्याला काम करायला लागले.  पवित्र  रिश्तामधील त्यांची सहअभिनेत्री अंकिता लोंखडे हिच्यासोबत तो अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. पण काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले.   

भारतीय किक्रेटर एम एस धोनी  चित्रपटात त्याने धोनीची भूमिका साकारली होती.   वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.