Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment National News Politician Politics

पाकिस्तानी एजंटच्या सांगण्यावरून जेएनयू मध्ये गेली होती दीपिका पदुकोण : ५ कोटी रुपये देखील घेतले होते

deepika-jnu
deepika-jnu

बॉलिवूडमध्ये सध्या सुशांतसिंह राजपूतच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वंशवाद आणि नेपोटीजम मुळे सध्या मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमध्ये वाद सुरु आहेत. मात्र याच वादादरम्यान आता नवीन विवाद समोर येताना दिसत आहे. माजी रॉ अधिकारी एनके सूद यांनी बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सूद यांनी दीपिकावर गंभीर आरोप करत म्हटले आहे कि, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ती जेएनयू मधील आंदोलनाला भेट द्यायला गेली होती. त्याचबरोबर यासाठी तिला पाच कोटी रुपये मिळाल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.

आपल्या युट्युब चॅनेलवर त्यांनी या संबंधित खळबळजनक खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोप केला आहे कि, दीपिका पदुकोण हिचे कनेक्शन थेट पाकिस्तानी नागरिक अनिल मुसर्रत याच्याशी आहे. अनिल मुसर्रत हा एक ब्रिटिश पाकिस्तानी नागरिक आहे. तो रिअल इस्टेटचा बिजनेस करत असून त्याचे वय ५१ वर्ष इतके आहे. या व्हिडिओमध्ये सूद यांनी आरोप केले आहेत कि, दीपिका पदुकोण हिने या आंदोलनात हजर राहण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले होते. अनिल मुसर्रत याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत.

इम्रान खान यांच्या निवडणुकीसाठी देखील त्याने त्यांना काही रक्कम दिली होती. इम्रानच्या बांधकाम व्यवसायामध्ये देखील मुसर्रत याची भागीदारी आहे. इम्रान खान या प्रोजेक्ट्मध्ये ५० लाख घरे बांधणार आहेत. त्याचबरोबर दीपिका पदुकोण जेएनयू मध्ये जाण्याआधी तिला दोन फोन आले होते. एक फोन काराचीवरून तर दुसरा फोन दुबईवरून आला होता. मुसर्रत किंवा दुसऱ्या व्यक्तीला तिला यासंदर्भात काही सूचना दिल्याचा आरोप देखील यामध्ये त्यांनी केला आहे.

यावर्षीच्या सुरुवातीला आपला सिनेमा छपक च्या प्रमोशनसाठी दीपिका जेएनयू मध्ये गेली होती. या ठिकाणी डाव्यांच्या संघटनेचे विद्यार्थी या कायद्याविरोधात आंदोलन करत होते. कन्हैया कुमारचा देखील या विद्यार्थ्यांना पाठिंबा होता. त्याचबरोबर सूद यांनी यामध्ये सांगितले आहे कि, २०१७ मध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नात अनिल कपूर, सुनील शेट्टी, ऋतिक रोशन, करण जौहर, रणवीर सिंह आणि सोनम कपूर यांसारख्या बड्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. याच लग्नात त्यांना कळाले कि, मुसर्रत याला अनिल कपूर जवळपास २५ वर्षांपासून ओळखत आहेत. त्याचबरोबर लंडनमध्ये ह्या कायद्याला होणाऱ्या विरोधासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला देखील हाच फंडिंग देत आहे.

दरम्यान, दीपिका पदुकोण हिच्या जेएनयू भेटीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला होता कि, काही कलाकार आपली मते आणि विचार मोकळेपणाने मांडत आहेत. मात्र तिच्या या भेटीचा तिला मोठा तोटा देखील झाला होता. तिचा सिनेमा छपाक हा जोरात आपटला होता. तिच्या या भूमिकेमुळे देशभरातून तिच्या या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता.