करण जोहरवर का केला जातोय टीकेचा भडीमार? काय आहे करण जोहरचे सत्य जाणून घ्या

करण जोहरवर का केला जातोय टीकेचा भडीमार? काय आहे करण जोहरचे सत्य जाणून घ्या

बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी नुकतेच आयुष्य संपवले. बॉलिवूडमध्ये प्रस्थापित मंडळींकडून डावललं गेल्यामुळे त्याने नैराश्यातून हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील या नेपोटीझमसाठी अनेक बड्या प्रस्थांना जबाबदार धरलं जात आहे. यामध्ये दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरवरसुद्धा आगडपागड केली जाते आहे. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या या लेखात आपण करण जोहरच्या काही वादग्रस्त विषयांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

कंगनाचे आरोप : आपल्या अभिनयकौशल्याच्या जीवावर सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या अभिनेत्री कंगना रानावतनेदेखील करणवर अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. करण हा प्रस्थापित अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्या मुलामुलींना चित्रपटसृष्टीत संधी देतात. ज्यांना काहीच पार्श्वभूमी नाही अशा नवोदितांकडे ते पाठ फिरवतात असाही आरोप कंगनाने केला होता.

काजोलशी वाद : करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील व्यावसायिक संबंध फार जुने आहेत. मात्र एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी करणने अजयला चोरीछुपे काही रक्कम प्रसिद्धीसाठी दिल्याच्या काही ऑडिओ क्लिप्स वायरल झाल्या होत्या. या प्रकारामुळे अजय प्रचंड संतापला होता. यामुळे अजयची पत्नी असलेल्या काजोल आणि करणच्या संबंधांत देखील वितुष्ट आले.

सुशांत सिंगच्या या घटनेनंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवरून करण जोहरवर टीकेची झोड उठवली होती. यामुळे वैतागलेल्या करणने तातडीने ट्विटरवरून हजारो लोकांना अनफॉलो केले होते. एकता कपूर, सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी यांच्यासह एकूण 8 जणांवर सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करायला लावल्याबद्दल मुजफ्फरपुर मधील सुधीर कुमार ओझा या वकिलाने याचिका दाखल केली आहे.