Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment National

५० वर्षीय दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आहे कंगना रानौत, ‘या’ व्यक्तीसोबत करू इच्छिते लग्न…

kangna ranaut
kangna ranaut

बॉलिवूडची आजची आघाडीची अभिनेत्री असलेली कंगना रानौत तिच्या फटकळ स्वभावासाठी ओळखली जाते. मात्र सध्याच्या घडीची ती आघाडीची अभिनेत्री असून आजपर्यंत ती अविवाहित आहे. काही वर्षांपूर्वी तिचे एका अभिनेत्याशी नाव देखील जोडले गेले होते, मात्र तिने त्या अभिनेत्याबरोबर पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र मागील काही वर्षांपासून ती एकटीच असून आता ती लग्नासाठी तयार असल्याची माहिती समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की लग्नासाठी ती एका बॉलिवूड व्यक्तीमुळे प्रेरित झाली आहे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीकडून कंगनाने प्रेरणा घेतली आहे ती व्यक्ती स्वतः विवाहित आहे.

मात्र तुम्ही आता विचार करत असाल हा कोण व्यक्ती आहे तर आम्ही तुम्हाला याबद्दल या लेखामध्ये माहिती सांगणार आहोत. या व्यक्तीविषयी आणि आपल्या लग्नाच्या विचारांविषयी अधिक बोलताना कंगनाने हे स्पष्ट केले आहे.प्रत्येकाची स्वतःची एक स्वप्नाळू व्यक्ती असते. कंगनाचा सुद्धा एक ड्रीम मॅन आहे. कंगना तिच्या या ड्रीम मॅनबद्दल बोलली. कंगना म्हणाली की ज्या व्यक्तीसोबत मी लग्न करेन तो माझ्यापेक्षा बुद्धिमान आणि हुशार असावा आणि याबरोबरच ती म्हणाली की तो रोमँ टीक असावा. तिला तिचा जुन्या प्रेमाचा अनुभवही आठवला. कोणासाठीही प्रेमात फसवणूक होण्याचा किंवा प्रेमात हारण्याचा अनुभव चांगला नाही. त्याचप्रमाणे कंगनाने असेही सांगितले की माझा प्रेमाचा अनुभव खूप वाईट आहे. मी त्याचा अधिक विचार करू शकत नाही. जे झाले ते झाले आणि आता मला एक नवीन सुरुवात करायची आहे.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंगना रनौत ज्या व्यक्तीकडून प्रेरित झाली आहे ती व्यक्ती एक चित्रपट निर्माता आहे. याविषयी बोलताना तिने सांगितले कि,कंगना म्हणते की माझ्यासारखा असणारा, माझ्यासारखाच विचार करणारा एखादी व्यक्ती शोधणे हे माझ्यासाठी कठीण होते. मात्र या व्यक्तीला भेटल्यानंतर माझं मत थोडं बदललं आहे. त्याचे त्याच्या पत्नीवर लग्नानंतर इतके वर्ष होऊन देखील असलेलं प्रेम पाहून माझे मन बदलेले आहे. त्यामुळे मी आता लग्नाचा विचार सुरु केला आहे. त्याचबरोबर आता माझ्यासाठी लग्न शक्य आहे.तो त्याच्या पत्नीला नेहमी मनापासुन साथ देत असतो. या सर्व गोष्टी पाहून मी लग्नाबद्दलचे माझे मत बदलत आहे.

ह्रितिक रोशनबरोबर होती नात्यात

कंगना रानौत काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा हँडसम अभिनेता ह्रितिक रोशन याच्याबरोबर देखील रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघे लग्न देखील करणार होते. मात्र त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याने त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याविषयी अधिक माहिती देताना कंगनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि, अभिनेता हृतिक रोशनचा घटस्फोट झाल्यानंतर आम्ही दोघं लग्न करणार होतो… पण पत्नी सुजानशी घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक बदलला…तो इतका बदलला की माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता….आम्ही चित्रपटात एकत्र काम केलं…आमच्यात संबंधही होते…पण त्याने सात वर्षाची मैत्री क्षणात तोडली…एवढंच नाही तर त्याने मला वेडी ठरवण्याचा प्रयत्नही केला, अशी खदखद बॉलिवूड ‘क्वीन’, अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केली होती.

याविषयी अधिक माहिती देताना कंगनाने सांगितले होते कि, हृतिक रोशनबरोबरचे संबंध संपुष्टात आल्यानंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने हा गौप्य-स्फो-ट केला. २०१५ मध्येच मी हृतिकचे वडील राकेश रोशन यांना फोन करून तुमचा मुलगा माझ्याशी विचित्र वागतोय. त्याला सांभाळा, असं सांगितलं होतं. त्यांनीही याप्रकरणात मला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं कंगनानं या मुलाखतीत स्पष्ट केलं. संबंध संपुष्टात आल्यावर मी त्याच्यावर आरोप करू नये हे दाखविण्यासाठीच त्याने मला वेडं ठरविण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्या डोक्याचा इ ला ज कर’, असा माझा मेसेज असणारा मेल त्यानेच माझ्या अकाऊंटवरून स्वत:ला पाठवला होता. माझी मानसिक स्थिती ठिक नसल्याचं दाखविण्यासाठी हा प्रयत्न होता. उद्या मी हृतिकशी संबंध आहे, असं म्हटलं असतं तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, ही त्यामागची खेळी होती, असा दावाही कंगनाने केला आहे.

माझे चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर हृतिक मला टाळायला लागला होता. त्यानं माझ्याशी भेटणं आणि बोलणंही बंद केलं होतं. त्याच्या वडिलांनीही हृतिकला भेटू नकोस म्हणून मला बजावलं होतं. तुमचे प्रेम संबंध आजपासून संपुष्टात आले, असं त्याच्या वडिलांनी मला सांगितलं होतं. त्यानंतर माझा क्वीन सिनेमा आला आणि तो सुपरहिट झाला. त्यातील माझ्या भूमिकेचं कौतूक झालं. त्यामुळे हृतिक परत माझ्याकडे आला आणि माझी माफी मागू लागला. तेंव्हा, ‘आधी डोकं ठिकाणावर ठेव आणि नंतर माझ्याकडे ये. तुला माझ्याशी लग्न करायचं की नाही, हे आधी स्पष्ट कर,’ असं मी त्याला ठणकावलं, असं ती म्हणाली.

मात्र आता प्रेमाचे ते कटू अनुभव मागे सोडून मला माझ्या आयुष्यात पुढे जायचे आहे. त्यामुळे मी आता लग्नाचा विचार करत असल्याचे तिने सांगितले. मात्र तुम्ही विचार करत असाल हा निर्माता कोण आहे तर त्याचे नाव नितेश तिवारी असून त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. त्याने बॉलिवूडमध्ये बर्‍याच चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.नितेश तिवारीच्या पत्नीचे नाव अश्विनी अय्यर तिवारी आहे. नितेश तिवारी हा ‘पंगा’ या कंगना रनौत स्टारर चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

नितेश तिवारीने आतापर्यंत चिल्लर पार्टी, भू-त-नाथ रिटर्न्स आणि दं-ग-ल, छिछोरे यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या व्यतिरिक्त त्याने ‘छिछोरे’ या चित्रपटाचे लेखन व निर्मिती केली आहे. त्यामुळे आता कंगना नितेश तिवारीमुळे प्रेरित झाली असून ती कुणाशी लग्न करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

About the author

Being Maharashtrian