Home » ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची पडद्यावरची आई वास्तविक जीवनात होती कोल्हापूरच्या नागसेविका…!
Entertainment

‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची पडद्यावरची आई वास्तविक जीवनात होती कोल्हापूरच्या नागसेविका…!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये जवळपास दशकभर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे श्रेय हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या हयातीत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या. या सर्वच भूमिका ते अक्षरशः जगले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जवळपास सर्व चित्रपट हे हिट ठरले होते व आज सुद्धा चाहते हे चित्रपट आवडीने बघतात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका अलका इनामदार यांनी बऱ्याचशा चित्रपटांमध्ये केली होती. अलका इनामदार वैयक्तिक आयुष्यामध्ये राजकारणाशी निगडित होत्या. त्यांच्याविषयीची काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका करणाऱ्या अलका इनामदार या अनेक चित्रपटांमध्ये सोज्वळ भूमिकांमध्ये दिसल्या. माहेरची साडी  यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या.

चित्रपट सृष्टी प्रमाणे त्यांचा राजकारणातही त्यांना रस होता व म्हणूनच त्या कोल्हापूर मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या. त्यांनी तेथील नगरसेविका पद भूषवले होते‌.अलका इनामदार यांचे पती हेसुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत होते. झपाटलेला या चित्रपटामध्ये धनाजीराव हे पात्र त्यांनी साकारले होते. काही वर्षांपूर्वी अलका इनामदार यांचे नि’ध’न झाले व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सहकलाकारांपैकी एका कलाकाराला चित्रपटसृष्टी मुकली.