Actors Actress Articles Bollywood Entertainment National

१४ व्या वर्षी मोलकरणीच्या प्रेमात पडले होते ओम पुरी, लाईट गेल्याच बघून मोलकरणीने…

Om_Puri
Om_Puri

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आजदेखील नवीन अभिनेत्यांच्या जमान्यात आपले स्थान राखून आहेत. उत्तम अभिनय आणि कौश्यल्याच्या बळावर ह्या अभिनेत्यांनी आजदेखील चित्रपटामध्ये भूमिका मिळवण्यात यश मिळवले आहे. यातीलच एक गाजलेले नाव म्हणजे ओम पुरी. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. बॉलिवूडमध्ये ओम पुरी यांनी जवळपास ४० वर्ष काम केले. ओम पुरी यांचे संपूर्ण नाव ओम राजेश पुरी होते.१८ ऑक्टोबर १९५० ला ओम पुरी यांचा जन्म पटियाला मध्ये झाला. ओम पुरी यांचे पूर्ण नाव ओम राजेश पुरी होते. पंजाबी कुटूंबात जन्मलेल्या ओम पुरी यांचे वडील भारतीय रेल्वेत आणि आर्मीत काम करायचे.

१९७६ मध्ये घाशीराम कोतवाल या मराठी सिनेमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुण्यातील सुप्रसिद्ध अशा फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया मधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. ज्यावेळी त्यांनी फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्युट ऑफ इंडियामध्ये शिकण्यासाठी प्रवेश घेतला होता त्यावेळी अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांना कसले कसले लोक हिरो बनायला येतात असा टोमणा मारला होता. बॉलिवूडमधील आणखी एक दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह हे ओम पुरी यांचे नॅशनल स्कुल ऑफ ड्रमा मधील क्लासमेट होते. आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत हे दोघे एकमेकांचे खास मित्र होते. अनेकदा ओम पुरी यांनी मुलाखतीमध्ये या मैत्रीविषयी भाष्य देखील केले आहे.

ओम पुरी नेहमी सांगायचे कि जर त्यांना नसरुद्दीन शाह यांनी त्यावेळी मदत केली नसती तर ते इथपर्यंत पोहचले देखील नसते.ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी लहानपणी खूप संघर्ष केला आहे. त्यांनी रोडच्या कडेला चहाचे कप धुवून आपला उदरनिर्वाह चालवला आहे. एवढेच नाही तर त्यांनी कोळसा उचलण्यापासून धाब्यावर भांडे धुण्याचे काम देखील केलं आहे. खूप गरिबीत संघर्ष करत त्यांनी नंतर मोठं यश मिळवलं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे ओम पुरी यांच्या गोष्टीतून आपल्याला दिसून येते. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी ओम पुरी यांना लहानपणी ट्रेनचा ड्रायव्हर होण्याची इच्छा होती.

त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीप्रमाणेच वैयक्तिक आयुष्य देखील खूप वादग्रस्त राहिले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक आरोप देखील लागले. त्याचबरोबर त्यांचे एका मोलकरणीबरोबर अफेअर असल्याचे देखील त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आजच्या या लेखात आपण याच्याविषयी माहिती घेणार आहोत.

ओम पुरी यांचे मोलकरणीसोबत होते अफेअर-
ओम पुरी यांचे आयुष्य फार वादग्रस्त होते. त्यांच्या पहिल्या पत्नी नंदिता यांनी ‘द अनलाइकली हीरो : द स्टोरी आॅफ ओम पुरी’ या पुस्तकात हा खुलासा केला होता. ओम पुरी यांचे वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीबरोबर अफेअर होते. याविषयी स्वतः ओम पुरी यांनी माहिती दिली होती. आजीच्या घरी असताना ओम पुरी यांना १४ व्या वर्षी आपल्या मोलकरणीवर प्रेम झाले. आजीच्या घरी येणाऱ्या ५५ वर्षीय मोलकरणीच्या ते प्रेमात पडले. ती मोलकरीण देखील त्यांच्यावर प्रेम करायची आणि त्यांना खूप जीव लावायची. एके दिवशी लाईट गेल्याच बघून मोलकरणीने त्यांचं घर गाठलं आणि दोघांनी पहिल्यांदा शरीरसंबंध देखील ठेवले.

ओम पुरी यांची पत्नी नंदिता यांनी ‘द अनलाइकली हीरो : द स्टोरी आॅफ ओम पुरी’ हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर आपली प्रतिमा मालिन झाल्याचा आरोप देखील ओम पुरी यांनी केला होता. प्रकाशनापूर्वी पत्नीने हे पुस्तक वाचू दिले नाही आणि विश्वासघात केल्याचे त्यांचे म्हणणे होते. ओम पुरी यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ६ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.