दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याविषयीच्या चर्चा माहित आहेत का? मुलीसोबतच करणार होते ‘ही’ गोष्ट

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याविषयीच्या चर्चा माहित आहेत का? मुलीसोबतच करणार होते ‘ही’ गोष्ट

बॉलिवूडमधील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्याविषयी अनेक किस्से आजही चर्चिले जातात. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या या लेखात आपण महेश भट यांच्या अनभिज्ञ बाजूंविषयी माहिती पाहणार आहोत.

विवाहबाह्य संबंधांमुळे चर्चेत : 80 आणि 90 च्या दशकात भट यांचे करियर अत्यंत प्रगतीपथावर होते. कॉलेजमध्ये ज्या मुलीवर त्यांचे प्रेम होते त्या किरण यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. मात्र काही कालावधीनंतर त्यांचे अफेअर परवीन बॉबी यांच्यासोबत सुरु झाले. पत्नी असतानाही विवाहबाह्य संबंधांमुळे महेश भट चर्चेत आले होते. 

मुलीसोबत लिपलॉक : मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट हिच्यासोबत महेश भट यांनी एका मासिकाच्या फ्रंट पेजसाठी केलेलं फोटोशूट त्याकाळी चर्चेचा विषय बनले होते. या मासिकाच्या फोटोमध्ये महेश भट आपली मुलगी पूजासोबत लिपलॉक किस करताना दिसत होते. तसेच त्यांनी एकदा पूजासोबत लग्न करण्याची इच्छादेखील जाहीरपणे बोलून दाखवली होती. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

आणखी एक विवाह : किरण भटसोबत लग्न केल्यानंतर काही कालावधीनंतर महेश भट यांनी सोनी राजदान यांच्यासोबत विवाह केला. त्यांना किरणपासून पूजा तर सोनी यांच्यापासून आलिया भट ही अपत्ये झाली. महेश भट यांच्या बाहेरख्यालीपणामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका करण्यात अली आहे.

सुशांतच्या आत्महत्येशी कनेक्शन : नुकतेच आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूशीदेखील महेश भट यांचे नाव अप्रत्यक्षरीत्या जोडले जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सुशांतपासून दूर करण्यात महेश भट यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. गर्लफ्रेंड दुरावल्यामुळे सुशांत नैराश्यात होता अशीही चर्चा होताना दिसून येत आहे