Actors Actress Bollywood Celebrities Entertainment National News Politician Politics

… म्हणून मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली…! भाजप खासदाराच्या ट्विटनं खळबळ

Sushant_Singh_Rajput
Sushant_Singh_Rajput

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अनेक मोठ्या स्टारची आणि अभिनेते आणि त्यांच्या मॅनेजर किंवा नोकरांची चौकशी केली आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची देखील चौकशी केली आहे

तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ३५ पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच त्याचे मित्र, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, कास्टिंग निर्देशक मुकेश छाबड़ा, दिल बेचारा या सिनेमातील त्याची सहकलाकार संजना सांघी आणि यशराज फिल्म्स चे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा याची चौकशी केली आहे. मात्र या घटनेला दररोज नवीन वेगळे वळण मिळत असून आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विट करून आपले मत मांडले असून यामध्ये सुशांतची हत्याच झाली असावी, असा संशय स्वामींनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे. ‘मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे,’ असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. सोबत कागदपत्रदेखील शेअर केले आहेत. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी अशा काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे, जे सुशांतच्या हत्येकडे इशारा करते. स्वामींनी एकूण 26 बाबी अधोरेखित केल्या आहेत.

स्वामींच्या मते, सुशांतच्या रूममध्ये ज्या अ‍ॅण्टी डिप्रेशन ड्रग्स मिळाल्यात त्या होऊ शकते अन्य कुणी तिथे ठेवल्या असाव्यात. सुशांतने गळफासासाठी वापरलेल्या कापडावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या गळ्यावरच्या खुणा बेल्टसारख्या कुठल्याशा वस्तूच्या आहेत. सुशांत गळफास घेतला त्या दिवशी तो व्हिडीओ गेम खेळत होता असे म्हटले जाते. स्वामींचे मानाल तर डिप्रेशनमध्ये असलेली कुठलीही व्यक्ति असा व्हिडीओ गेम खेळू शकत नाही. सुशांतच्या खोलीत सुसाईड नोट न मिळणे स्वामींना खटकते आहे. एकंदर त्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अनेक दावे केले आहेत. यामुळे आता स्वामींच्या या संशयानंतर पोलीस त्या दिशेने तपास करणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,सुब्रमण्यम स्वामींनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यामुळे आता बिहार पोलीस काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.