Actors Actress Bollywood Celebrities Entertainment National News Politician Politics

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवीन खुलासा: मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव?

सुशांतसिंह राजपूत याच्या आ त्म ह त्येला एक महिना पूर्ण झाला. त्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अनेक मोठ्या स्टारची आणि अभिनेते आणि त्यांच्या मॅनेजर किंवा नोकरांची चौकशी केली आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची देखील चौकशी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ३५ पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच त्याचे मित्र, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, कास्टिंग निर्देशक मुकेश छाबड़ा, दिल बेचारा या सिनेमातील त्याची सहकलाकार संजना सांघी आणि यशराज फिल्म्स चे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा याची चौकशी केली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक शेखर कपूर यांची देखील चौकशी केली आहे.

मात्र बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर या प्रकरणाला दररोज वेगळे वळण मिळत आहे. यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिस तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतच्या आ त्म ह त्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी तात्काळ हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती आमदार अतुल भातखलकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. आमदार भातखलकर यांनी सांगितलं की, सुशांतच्या आ त्म ह त्या प्रकरणाचा तपास CBI ने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता पार्थ अजित पवार यांनी देखील केली आहे. तसेच सुशांतची बहीण मितू सिंह हिने देखील मुंबई पोलिसांच्या तपासावर साशंकता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, सुशांत आ त्म ह त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र, आता याबाबत राज्यात वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी बिहार पोलिसांनी मुंबईमध्ये येताच तात्काळ तपासाला सुरुवात करत पुन्हा एकदा सर्वांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. बिहार पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यात सुशांत सिंह राजपूतची बहीण मितू सिंह हिची बिहार पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मितू हिने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिल्याचं समजतं.यामध्ये पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत याची बहीण मितु सिंह हिचा देखील जबाब नोंदवला आहे. यात मितूने सर्वात आश्चर्यकारक बाब सांगितली ती म्हणजे, सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत होती. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराने सांगितली होती.

दरम्यान, आता भाजप आमदाराच्या या आरोपानंतर हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलीस काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

Being Maharashtrian