Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment Featured

… म्हणून लग्न झालेले पुरुषच आवडतात नायिकांना?

heroine
heroine

बॉलिवूड हि चंदेरी नगरी समजली जाते. या ठिकाणी येण्यासाठी अनेक तरुण आणि तरुणी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष खर्च करत असतात. मात्र याठिकाणी येणारा प्रत्येक जण टिकून राहतोच असे नाही. या ठिकाणी सगळ्यांनाच काम मिळते ते नाही. मात्र कष्ट करणारा या इंडस्ट्रीत टिकून राहतो हे देखील तितकेच खरे आहे. आजतागायत अनेक बाहेरचे अभिनेते देखील मुंबईत आणि बॉलिवूडमध्ये आले. यांपैकी काहींनी नाव कमावले तर काहींना या ठिकाणी यश मिळाले नाही. त्याचबरोबर अनेक अभिनेत्री देखील बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येत असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिका म्हणजे कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नायिका. त्यांचे कोट्यवधी प्रशंसक असतात. यात अनेक श्रीमंत तरुणांचाही समावेश असतो. मात्र यातील अनेक नायिका या व्यावसायिक आणि अभिनेत्यांशी लग्न करतात. मात्र यामध्ये हे देखील महत्वाचे आहे कि, या अभिनेत्री लग्न झालेल्या अभिनेत्यांबरोबरच लग्न करतात. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो कि, या अभिनेत्री अनेक पर्याय असताना या घटस्फोटित व्यक्तींशी लग्न का करतात. आजच्या या लेखात आपण याच विषयावर जाणून घेणार आहोत.

१) जुही चावला
बॉलिवूडमध्ये एकेकाळी सर्वात सुंदर आणि सुशील अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जुही चावला हिनेदेखील एका व्यवसायिकाशी लग्न केले आहे. मात्र जुही चावला हिच्याबरोबर लग्न करण्याआधी जय मेहता याचे लग्न झाले होते. त्याने यश बिर्लाच्या बहिणीशी विवाह केला होता. मात्र एका विमान अपघातात त्याची पत्नी सुजाता हिचे निधन झाल्यानंतर त्याने अभिनेत्री जुही चावला हिच्याशी विवाह केला. १९९५ मध्ये जुही आणि जय मेहताने लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत.

२)विद्या बालन
विद्या बालन हिने देखील एका घटस्फोटित व्यक्तीशी विवाह केला आहे. तिने एक नाही तर दोन लग्न मोडलेल्या सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्न करून सगळ्यांनाच चकित केले होते. सुरुवातीला त्याने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर झाले होेते. परंतु काही कारणाने हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर सिद्धार्थने एका मालिका निर्मात्रीबरोबर लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही.त्यानंतर त्याने विद्या बालन हिच्याबरोबर लग्न केले आहे. या दोघांना अद्याप मुलं झालेलं नाही.

३)करीना कपूर
करीना कपूर हिने देखील एका घटस्फोटित अभिनेत्याशी विवाह केला आहे. तिने आपल्या पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफ अली खान याच्याशी विवाह केला आहे. करीना कपूर हिच्याबरोबर विवाह करण्याआधी सैफने अमृता सिंहबरोबर लग्न केले होेते. त्यांना दोन मुले सारा आणि इब्राहिम आहेत. त्याचबरोबर करीना कपूर आणि सैफ अली खान यांना देखील एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर अली खान आहे.

४)शिल्पा शेट्टीने
शिल्पा शेट्टी हिने प्रख्यात व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्राचे पहिले लग्न कविता नावाच्या मुलीसोबत झाले होते. परंतु ते लग्न फार काळ टिकले नाही.त्यांनी घटस्फोट घेतला.त्यानंतर त्याने शिल्पा शेट्टी हिच्याशी विवाह केला. त्यांना विवान नावाचा एक मुलगा आहे. मात्र पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे कारण शिल्पा शेट्टी हीच असल्याचे सांगितले जात आहे.

५)श्रीदेवी
श्रीदेवी हि एकेकाळी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करत होती. मात्र तिने देखील एका चित्रपट निर्मात्याशीच विवाह केला होता. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिचे आणि अभिनेता मिथुनचे प्रेम प्रकरण सुरु होते. मात्र काही वर्षांनी वेगळे झाले. त्यानंतर श्रीदेवी हिने निर्माता बोनी कपूरला साथीदार निवडले. बोनी कपूरचे अगोदरच लग्न झालेले होते आणि त्याला दोन मुले अर्जुन आणि अंशुल होती. गरोदर राहिल्याने श्रीदेवी आणि बोनी कपूरने लगेचच लग्न केले. लग्नानंतर श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी अशा दोन मुली झाल्या. त्याच्या पहिल्या पत्नीपासून देखील असलेल्या अर्जुन कपूर याने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून नाव कमावले आहे.

६)हेमा मालिनी
अशा नायिकांचा विचार सुरू केला असता सगळ्यात अगोदर डोळ्यांसमोर नाव येते ते ड्रीम गर्ल हेमा मालिनीचे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या जोडीचे.हेमा मालिनीसोबत लग्न करण्यास संजीव कुमार, जितेंद्र तयार होते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी आजदेखील चवीने चघळली जाते. हेमा मालिनी हिच्याबरोबर धर्मेंद्र यांनी लग्न केले त्यावेळी ते विवाहित होते. मात्र हेमा मालिनी हिला पाहताच ते तिच्या प्रेमात पडले. मात्र पहिले लग्न झालेले असताना त्यांनी दुसरे लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यानंतर दोघांनी लग्न केले. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले होते. त्यानंतर हेमा मालिनी हिच्यापासून देखील त्यांना दोन मुली झाल्या.

७) राणी मुखर्जी.
एकेकाळी बॉलिवूडमधील चुलबुली अभिनेत्री असणारी राणी मुखर्जी देखील सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. तिने देखील एका चित्रपट निर्मात्याशी विवाह केला आहे. राणी मुखर्जी हिने यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्राबरोबर लग्न केले आहे. मात्र राणी मुखर्जी आदित्यचे अगोदरच लग्न झाले होते. त्या पत्नीचे नाव पायल होते. परंतु मूल होत नसल्याने दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्याच वेळेस आदित्य आणि राणी एकत्र आले. आदित्यने पायलला घटस्फोट दिला आणि राणीशी लग्न केले. त्यानंतर राणीने एका मुलीला जन्म दिला असून सध्या ती बॉलिवूडपासून दूर आहे.

याशिवाय जयाप्रदा, शबाना आझमी यांनीही अगोदरच लग्न झालेल्या पुरुषांबरोबर लग्ने केली आहेत.