Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment Movies

लग्नाच्या लिफाफ्यामध्ये ‘इतके’ रुपये ठेवतात बॉलीवूड स्टार्स, जाणून तुम्हाला बसेल झटका

भारतीय लग्न म्हणजे एक उत्सव असतो. त्यामुळे भारतीय लग्न करताना केवळ वधू आणि वरामध्ये विवाह होत नाही तर त्या दोघांच्या कुटुंबाचा देखील विवाह होतो असे म्हणतात. त्याचबरोबर भारतीय लोकं लग्नात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असतात. लग्नात केवळ कपड्यांवरच नाही तर भारतीय लोकं लग्नाच्या हॉलपासून स्वादिष्ट भोजन, लाईटिंग, बँड बाजा वरात या सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात.

त्याचबरोबर लग्नामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नामध्ये गिफ्ट किंवा आहेर काय द्यायचा. त्यामुळे लग्नात कोणती कपडे घालावीत यापेक्षा जास्त विचार आहेर काय द्यावा यासाठीच जास्त विचार करावा लागतो. मात्र अनेकदा आपण आहेर देण्याऐवजी किंवा काही गिफ्ट देण्याऐवजी एका पाकिटामध्ये पैसे टाकून देत असतो. यामध्ये किती पैसे टाकले जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे. मातुर यामध्ये किती रुपये टाकावेत या गोष्टी प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते.

त्याचबरोबर तुम्ही गिफ्ट देत असलेला व्यक्ती तुमच्या किती जवळ आहे यावर देखील हि रक्कम अवलंबून असते. तुमच्या घरातील लग्नामध्ये त्याने किती रुपये दिले होते, लग्नामध्ये भोजन करण्यासाठी तुमच्या घरामधून किती लोक जात आहेत. असे सामान्य लोकांचे काही मापदंड असतात. याच आधारावर ते निश्चित करतात कि लिफाफ्यामध्ये किती रक्कम द्यायची आहे.

आपण सामान्य व्यक्ती पैसे देताना आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करतो, मात्र सेलिब्रिटी लोकं अशाप्रकारे लग्नामध्ये किती रुपये देत असतील याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्यांच्याकडे पैशाची अजिबात कमी नसते. त्यामुळे ते लग्नसोहळ्यात जाताना किती रुपये लिफ्याफ्यामध्ये ठेवत असतील. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत. सेलिब्रिटींची लागणे फार मोठी होत असतात. त्यामुळे त्यांच्या लग्नावर सगळ्यांचेच लक्ष असते. मीडियाचे देखील त्यांच्या लग्नावर लक्ष असते.

इतके पैसे ठेवतात सेलिब्रिटी लिफ्याफ्यामध्ये

सेलिब्रिटी लोकांकडे सर्व काही असते. त्यामुळे त्यांना लग्नामध्ये काही भेटवस्तू देणे म्हणजे कुबेराला पैसे देणे. मात्र लग्नामध्ये शगुन म्हणून काहीनाकाही देण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी लोकं देखील एकमेकांना काहीतरी देतच असतात. मात्र अमिताभ बच्चन यांनी नुकताच यासंदर्भात एका कार्यक्रमामध्ये खुलासा केला होता. एकदा कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मा याने अमिताभ बच्चन यांना याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळकी बच्चन यांनी उत्तर देताना सांगितले होते कि,फिल्म इंडस्ट्रीमध्ये गिफ्टच्या स्वरुपात लिफाफ्यामध्ये शकून म्हणून १०१ रुपये दिले जातात.

मात्र इतके करोडो रुपये कमवून देखील इतकी कमी रक्कम दे का देत असतील असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मात्र यामागे एक मोठे कारण आहे. खासकरून जूनियर आर्टिस्ट आणि कॅमेरामनसारखे लोक आपल्यापेक्षा मोठ्या कलाकार किंवा निर्माता, डायरेक्टर इत्यादीच्या पार्टीमध्ये जाण्यास संकोच करत होते.त्यामुळे सर्वांनी मिळून म्हणजेच इंडस्ट्रीने मिळून १०१ रुपये हि रक्कम निश्चित केली. यामुळे सर्व कलाकारांमध्ये समानता राहते आणि कुणालाही यामुळे विवाह सोहळ्यामध्ये सामील होण्यास संकोच वाटत नाही.

About the author

Being Maharashtrian