Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment National

‘मी दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होऊ लागले होते’, पति पासून वेगळ राहिलेल्या ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटीचे विवाहित जीवन शिकवते खूप काही…

alka yadnik
alka yadnik

बॉलिवूडमध्ये अनेकदा घटस्फोटाच्या बातम्या आपण ऐकत असतो. नुकतेच अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला २९० वर्ष पूर्ण झाली. अलीकडेच एका बॉलिवूड अभिनेत्याचा घटस्फोट झाला. मात्र बॉलिवूडमध्ये काही अश्या देखील जोड्या आहेत जे एकमेकांपासून काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मनात घटस्फोटाचा विचार आलेला नाही. आजच्या या लेखात आपण अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांच्यासारखे जोडपे इतरांसाठी एक आदर्श उदाहरण आहेत याची माहिती तुम्हाला देणार आहोत.

26 वर्षांहून अधिक काळ वेगळे राहणारे हे जोडपे पती-पत्नीची इच्छा असल्यास प्रत्येक अडचणीवर मात करून प्रेम व नाते टिकवून ठेवता येते याचं एक उदाहरण आहे. तुम्ही जाणून घ्या की हे प्रसिद्ध सिंगर आणि तिचा व्यावसायिक नवरा कित्येक दशकांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत जेणेकरून इतर जोडपी त्यांच्याकडून काहीतरी चांगले शिकू शकतील. अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांचा विवाह १९८९ मध्ये झाला आहे. मात्र आपल्या पत्नीसाठी त्यांनी लांब राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरल्या आहेत. एक म्हणजे पार्टनर साठी सर्वोत्कृष्ट विचार करणे आणि दुसरी कम्यूनिकेशन आणि एकत्र भेटणे. या दोन गोष्टींमध्ये समन्वय साधल्याने या जोडप्याला आपल्यात असलेलं प्रेम कायम राखण्यात यश मिळाले.

१)पार्टनर साठी सर्वोत्कृष्ट विचार करणे:-
अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांचा विवाह १९८९ मध्ये झाला आहे. नीरज यांचा व्यवसाय हा शिलॉंगमध्ये स्थायिक आहे. मात्र आपल्या पत्नीच्या कारकिर्दीचे महत्व समजून त्यांनी आपलं व्यवसाय मुंबईमध्ये स्थायिक करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईमध्ये त्यांना हवा तितका नफा मिळाला नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने अल्काने पुन्हा तिच्या नवऱ्याला शिलाँगमध्येच व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ती नीरजला तिथेच रहाण्यास सांगू शकली असती पण तिला माहित होतं की तीचे करियर जसे महत्वाचे आहे तसेच त्याचं कामही तिच्या पतीसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला या जोडप्यामधील समन्वय याठिकाणी दिसून येतो.

बरेचदा असे दिसून येते की लग्नानंतर एक व्यक्ती त्याच्याबरोबरच्या व्यक्तीला करियरमध्ये तडजोड करण्यास सांगतो जेणेकरून दोघांच्या महत्वाकांक्षा कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ नये. पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. दोघीनींही आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्यामुळे आयुष्यासाठी तडजोड करायला भाग पाडणे म्हणजे त्याचे स्वप्नांचा गळा चिरून जगण्यासारखे आहे. जोडीदाराला तो कधीच विसरलेला नसतो आणि हे त्याच्या मनात नकारात्मक स्मृतीसारखेच होते ज्याचा कधीकधी मोठा उद्रेक होतो आणि मग संबंध हाताळणे कठीण होते. त्यामुळे या अशा कठीण परिस्थितीत एकमेकांना सांभाळून आणि समजून घेणेदेखील फार महत्वाचे आहे.

२)कम्यूनिकेशन आणि एकत्र भेटणे:-
नात्यात समन्वयबरोबरच संवाद देखील फार महत्वाचा असतो. त्यामुळे एकमेकांमधील संवाद हा देखील नात्यामध्ये घट्टपणा राहण्यासाठी महत्वाचा ठरतो. एकमेकांच्या कामात व्यस्त असून देखील एकमेकांबरोबर संवाद राखणे फार महत्वाचे आहे. हे दोघे कारकीर्दीत व्यस्त असूनही दोघे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबई आणि शिलांगमध्ये एकत्र यायचे. त्यांनी आपल्यातील संवाद कमी होऊ दिला नाही. हे जोडपे लांब पल्ल्याच्या नात्यात किंवा कामामुळे व्यस्त असो त्यांनी बोलण्यासाठी आणि एकमेकांना भेटायला वेळ काढला. त्यामुळे त्यांच्या गोडवा हा कायम तसाच राहिला. या सगळ्यात जर थोडीशी जरी घट झाली तरी नात्यातील गोडवा कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेक विवाहित जोडप्यांमध्ये वेगळे होण्याची परिस्थिती आहे.

३)आकर्षण आणि प्रामाणिकपणा:-
आपल्या पतीपासून वेगळे राहिल्यानंतर मुंबईमध्ये त्या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. मात्र कामाच्या निमित्ताने विविध पुरुषांशी त्यांची भेट होत होती. सतत वेगळे असल्यामुळे असे अनेक प्रसंग आले जेव्हा जेव्हा ती इतर पुरुषांकडे आकर्षित झाली. मात्र तिने कधीही आपल्या सीमा ओलांडल्या नाहीत. कारण काहीही असो परंतु जेव्हा जोडीदारास ,ओठ्या कालावधीत एकटेपणा जाणवतो तेव्हा तो इतर व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतो जिथून त्याच्या भावना पूर्ण झाल्यासारखे दिसते.मात्र जर तुमच्या मनात जोडीदाराविषयी प्रेम असेल आणि तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत असाल तर तुमच्या नात्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी तुमच्यातील प्रेम कुणीही कमी करू शकत नाहीत.