Actors Actress Marathi News

हा प्रसिद्ध अभिनेता आज देखील राहतो या घरात

काही अभिनेते किती ही मोठे झाले तरी त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवर असतात .त्यापैकी अनेक अभिनेते आज देखील आपल्याला  पाहण्यास मिळतात .त्यामध्ये  नागराज मंजुळे  यांचे नाव प्रामुखाने घेतले पाहिजे .

पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म पासून चित्रपट क्षेत्रात नागराज मंजुळे यांची सुरवात झाली . ही शॉर्टफिल्म खूप लोकप्रिय झाली .त्यांतर जे नागराज मंजुळे यांचे चित्रपटसृष्टीत  आले  व त्यांनी प्रेक्षकांवर गारुडाच केले .  त्यामध्ये फँड्री, सैराट व  नाळ यांसारखे एकाहून एक  चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले.

 सैराट या चित्रपटाने तर खुप वेगवेगळे विक्रम स्वताच्या नावावर केले .नाळ चित्रपटात त्यांनी निर्मिती करण्याबरोबर त्यांनी  चित्रपटात महत्वाची   भुमिका देखील केली .  त्यातच त्यांचा झुंड हा हिंदी चित्रपट देखील लवकर येत आहे .याचित्रपटामध्ये  अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

नागराज मंजुळे यांचे सोलापूर जिल्यातील जेऊर या गावात त्यांचे  वडिलोपार्जीत  घर आहे , नागराज मंजुळे आजही गावी गेल्यानंतर त्याच घरात राहतात . नागराजचे हे घर खुपच  साधे आहे . चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी त्या  घराला रंग दिला व  त्याची डागडुजी देखील केली आहे .त्यामुळे माणुस किती ही मोठा झाला तरी त्याच्या घराबद्दल ओड मात्र कधी कमी होत नाही हे नागराज मंजुळे यांच्या या कृतीतून दिसुन येते