‘या’ अभिनेत्याला जुही चावला बरोबर करायचे होते लग्न, अजूनही आहे अविवाहित….

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्याविषयी मी तुम्हाला आज भन्नाट माहिती देणार आहे. सलमान खान याने अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही, मात्र एकेकाळी त्याने लग्नासाठी एका अभिनेत्रीच्या वडिलांकडे मागणी देखील घातली होती. मात्र त्यांनी त्याला नकार दिल्याने त्याचे लग्नाचे स्वप्न अपूर्ण राहिले.

आम्ही बोलत आहोत सलमान खान आणि जुही चावला यांच्याविषयी. 90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री असलेली जुही आणि सलमान खान यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. जुही चावला हि माजी मिस इंडिया असून तीस वर्षांपूर्वी तिने हे विजेतेपद मिळवले होते.

आजही जुही चावला अनेकांच्या मनावर राज्य करत असून साध्य मात्र ती बॉलिवूडमध्ये काम करत नाही. जुही चावला हिने 1986 मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने एकामागून एक हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

एकाबाजूला जुही चावला अभिनेत्री म्हणून नाव कमवत होती तर सलमान खान दुसऱ्या बाजूला नुकताच आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याने जुही चावला हिला पाहिल्यानंतर त्याला ती आवडली. त्याने तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी थेट तिच्या वडिलांकडे मागणी घातली होती. मात्र तिच्या वडिलांनी नकार दिल्याने त्याला तिच्याबरोबर लग्न करता आले नाही. त्याने एका मुलाखतीमध्ये हि गोष्ट मान्य केली होती.

मला त्यावेळी जुही प्रचंड आवडत असल्याने तिच्याशी लग्न करायची इच्छा होती, असे सलमानने त्यावेळी कबूल केले होते. सध्या मात्र जुही चावला हिने उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केले असून ती तिच्या आयुष्यात खुश असून सलमान खान याने मात्र अजूनपर्यंत लग्न केलेले नाही.

जुही हि एक चांगली अभिनेत्री असून चांगली मुलगी असल्याने ती उत्तम सून आणि पत्नी देखील होऊ शकते, असे मला वाटले होते. त्यामुळे मी तिचा हात तिच्या वडिलांकडे मागितला होता. मात्र त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत मी बसत नसल्याने त्यांनी मला नकार दिला, असेदेखील सलमान खान याने या मुलाखतीत सांगितले होते.