Actress

कियारा अन आलिया काय आहे कनेक्शन; नावाप्रमाणे व्यक्तिरेखा बदलून कोट्यावधी झालेली अभिनेत्री कियारा

कियारा अन आलिया काय आहे कनेक्शन; नावाप्रमाणे व्यक्तिरेखा बदलून कोट्यावधी झालेली अभिनेत्री कियारा

‘एम.एस. धोनी : द अनडोल्ट स्टोरी’ या चित्रपटात साक्षीची भूमिका साकारून तिच्या प्रवासाला सुरवात झाली. तिचं सौंदर्य, तिचा साधा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आणि कियाराचा सालस चेहरा प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनला. त्यानंतर ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये याच सालस चेहऱ्या मागे असणाऱ्या एका अतिशय मादक स्त्रीचे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपटातील एका दृश्यामुळे कियारा चर्चेचा विषय ठरली.

‘लस्ट स्टोरीज’नंतर ‘कबीर सिंग’मध्ये प्रितीची शांत आणि गरीब गाईची भूमिका साकारत तिने तरुणांची मनं जिंकली. प्रत्येक तरुणाला आपल्याला अशीच गर्लफ्रेंड हवी असं वाटू लागलं. या दोन चित्रपटांचा कियाराच्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे आणि याच दोन चित्रपटांमुळे गेल्या काही वर्षांत तिच्या संपत्तीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

कियाराने २०१४ मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर २०१६ मध्ये ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. ‘लस्ट स्टोरीज’मध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्यानंतर कियाराला ‘भारत अने नेनू’, ‘कलंक’, ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’ या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या.

डबु रत्नानी याच्या कॅलेंडरवर तिचा सेक्सी फोटो पाहून अनेकांची हृदयं थांबली. गुड न्यूज मध्ये तिची विनोदी भूमिका आपल्याला खळखळून हसवते आणि क्षणात रडवते सुद्धा. कियाराचे खरे नाव आलिया आहे मात्र, आलिया भट आधीच बॉलीवुडमध्ये असताना एकाच नावाच्या दोन अभिनेत्री चालणार नाही म्हणून तिचे नाव तिने सलमानच्या सांगण्यावरून कियारा करून घेतले.

प्रत्येक पठडीची व्यक्तिरेखा ती अत्यंत सुबकपणे आपल्या अभिनयाने सजवते. हीच तिची खासियत आहे. आणि म्हणूनच ती खूप कमी काळात खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे. कियाराची एकूण संपत्ती जवळपास २१ कोटी इतकी आहे.

About the author

Being Maharashtrian