Home » 1972 च्या एका गोष्टीमुळे ‘या’ गवताला कॉंग्रेस गवत असे नाव पडले आणि शेतीला एकप्रकारची किडचं लागली असं म्हणावं लागेल…
Agriculture

1972 च्या एका गोष्टीमुळे ‘या’ गवताला कॉंग्रेस गवत असे नाव पडले आणि शेतीला एकप्रकारची किडचं लागली असं म्हणावं लागेल…

भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष हा सत्तेवर होता व यामुळेच भारतातील समाजव्यवस्था व राजकीय व्यवस्थेवर आणि दैनंदिन आयुष्यातील अनेक घटकांवर काँग्रेसची छाप दिसून येते. यापैकीच एक म्हणजे काँग्रेस गवत होय. मुळात काँग्रेस गवत हे नाव कसे पडले असा प्रश्न बऱ्याचदा पडतो.

1972 च्या काळामध्ये दुष्काळग्रस्त भारतात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य लोकही हवालदिल झाले होते. देशामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राज्य होते. ते सत्तेवर असताना स.का.पाटील यांनी अमेरिकेकडून 1.5 अब्ज डॉलर इतक्या किमतीचे धान्य आयात करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.

या प्रस्तावाला अंतर्गत 1.6 कोटी टन इतका गहू व दहा लाख टन इतका तांदूळ अमेरिकेकडून आयात करणे प्रस्तावित होते. त्यावेळी भारत हा साम्यवादाला प्रोत्साहन देत होता. त्यामुळे भांडवल शाही गटा मध्ये मोडणाऱ्या अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीबाबत सर्वत्र थोडीशी साशंकता होती. मात्र परिस्थिती ओळखून हा करार संमत करण्यात आला. अमेरिकेने ज्यावेळी भारतामध्ये धान्य आयात केले त्यावेळी त्याची फारशी खबरदारी

घेतली गेलेली नव्हती व तपासणी सुद्धा करण्यात आली नाही. या आयात केलेल्या गव्हामध्ये काँग्रेस गवताचे रोपे व बिया सुद्धा आयात केल्या गेल्या. मुळातच हे धान्य माणसांच्या खाण्यालायक नव्हते तर अमेरिकेत असे खाणे डुकरांना खाद्य म्हणून दिले जात होते असे सांगितले जाते. अमेरिकेने केलेल्या या मदतीमुळे निकृष्ट धान्य तर भारतीयांच्या हातात पडले पण त्याबरोबरीनेच सोबत आलेल्या अनावश्यक काँग्रेस गवताच्या बिया या भारताच्या शेतीमध्ये अशाप्रकारे रुजल्या की भारतीय शेतीला एक प्रकारे लागलेली कीड याला म्हणावे लागेल.

या गवताचा उपयोग हा शून्य आहे असे म्हटले तरीही चालेल कारण गुराढोरांना खाण्यासाठी म्हणून हे गवत देण्याच्या लायकीचे नाही व यामुळे शेतामध्ये लागलेल्या पिकांचेही नुकसान होत होते. 1972 नंतर अनेक वर्षे शेतकऱ्यांना या गवताच्या या त्रासाला सामोरे जावे लागले.या गवतावर पांढऱ्या रंगाचे फूल येत असे. काँग्रेस पक्षाची टोपी सुद्धा पांढरी असे म्हणूनच या गवताला काँग्रेस गवत हे नाव रूढ झाले.

कॉंग्रेस गवताला  गाजर गवत असेही म्हटले जाते. गाजर गवत हे आशिया आफ्रिका आणि अमेरिका या तीनही खंडांमध्ये आढळून येते मात्र याची उत्पत्ती ही मेक्सिकोमध्ये सर्वात प्रथम झाली. त्यानंतर 1950 नंतर अमेरिके कडून अन्य राष्ट्रांना केलेल्या मदत स्वरूपातील धान्य द्वारे काँग्रेस गवत हे सर्वत्र पसरले गेले.

केवळ भारताबद्दल बोलायचे झाले तर सध्या भारतातील शेतकऱ्यांची मालकी असलेले बहुतांश क्षेत्र या कॉंग्रेस गवत त्यामुळे वाया गेले आहे.  गाजर गवत हे अंगाला खाज निर्माण करते त्यामुळे अंगावर खाज सुटून पुरळ निर्माण होते. काही विशिष्ट प्रकारच्या एलर्जीसुद्धा ,आतड्यांची संबंधित कार्याचे आजार हे या गवताचे वारंवार येण्यामुळे निर्माण होऊ शकते.