Home » पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड, मोबाईल मध्ये मिळवा शेतातली विविध प्रकारची माहिती…
Agriculture

पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड, मोबाईल मध्ये मिळवा शेतातली विविध प्रकारची माहिती…

माहिती व ज्ञान कुठल्याही गोष्टीचा धोका टाळण्यासाठी किंवा एखादी अडचण सोडवण्यासाठी सर्वात चांगला उपाय हाच की त्याबद्दल पुरेपूर माहिती व ज्ञान अवगत करणे. मग ती अडचण तितकी अवघड वाटत नाही जितकी आधी वाटायची. आजकाल तंत्रज्ञान इतके विकसित झाले असून प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. “पण शेती जो भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो तिथे तंत्रज्ञानाचा वापर इतका कमी का?” आपण पाहू शकतो तंत्रज्ञानाचा वापर करून इजराइल सारख्या छोट्याशा देशांनी पण जी प्रगती केली आहे ती अतुलनीय आहे.

जितके महत्त्व शेतीचे आहे तितकेच जास्त धोके आणि अडचणी एक भारतीय शेतकरी अनुभवतोय. काय होईल जर आपल्याकडे या शेतीत येणाऱ्या सगळ्या अडचणी बद्दल माहिती असेल आणि त्या येण्याआधीच आपण त्यांचा अंदाज लावून त्यावर उपाय करू शकलो तर? हीच अडचण लक्षात घेता सुमित व सुधांशू या दोन युवकांनी एक तंत्रज्ञान विकसित केले “फायलो”. या दोन्ही युवकांचे अभियांत्रिकी शिक्षण झालेले असून त्यांना पारिवारिक शेतीचा वारसा लाभलेला आहे.

“आम्ही शेतामध्ये एक IOT डिव्हाईस तैनात करतो ज्यानी शेतकरी व शेतीतील एक दरी कमी होते. हे IOT डिव्हाईस विविध सेन्सर द्वारे काम करत असून शेतातील विविध घटके ज्यामुळे शेतात अडचणी निर्माण होतात त्यांची माहिती आमच्या क्लाऊड सर्वर वर पाठवतो. त्यानंतर ही माहिती ॲप वरती पाठवली जाते. अंतर्दृष्टी प्रधान करण्यासाठी कृषी शास्त्राच्या विविध मॉडेलचा वापर करून डिवाइस, पीक व मातीच्या माहितीचे विश्लेषण केले जाते. ॲप वरील अलर्ट नोटिफिकेशन व माहिती शेतकरी पाहू शकतात व त्यावरून निर्णय घेण्यास मदत होते.” – सुमित व सुधांशू

रोग व किटके आणि पाणी हेच भारतीय शेतीतील सर्वात मोठ्या अडचणी आहेत. जर रोग व कीटके येण्याआधी त्याचा अभ्यास करून आपण त्यांचे नियोजन करू शकलो तर नक्कीच शेतीतील मोठा धोका आपण कमी करू शकतो जे की फायलो मुळे शक्य झाले आहे. तसेच पिकातील पाण्याचे व्यवस्थापन पाहता रोपावर दोन स्तिथीमध्ये ताण येतो ,एक तर जास्त पाणी अथवा कमी पाणी.

आणि फायलो सेन्सर आपल्याला झाडाची जेवढी गरज आहे तेवढेच पाणी देण्यास मदत करते. पाणी नियोजन हा खूप महत्त्वाचा घटक असून शेतातील 80 टक्के अडचणी यानीच सोडू शकतो. मागील दोन वर्षाचा विचार करता बऱ्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी त्यांच्या शेतीत प्रगतशील रीत्या विकास केला आहे.