Home » चपाती आणि पोळी यामध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या…!
Article Entertainment Fashion Travel

चपाती आणि पोळी यामध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या…!

निरोगी शरीरासाठी चौरस आहार घेणे हे खूप आवश्यक असते. भारतीय आहार पद्धती मध्ये चौरस आहाराचे नियोजन खूप पूर्वीपासून केले आहे. भारतीय आहारामध्ये पिष्टमय पदार्थ, कर्बोदके ,प्रथिने ,जीवनसत्वे इत्यादींचा समावेश असलेल्या निरनिराळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. भारतीय पदार्थांमध्ये वरण ,भात, कोशिंबीर ,भाजी ,पोळी किंवा चपाती,रोटी इत्यादींचा समावेश असतो.

भारतीय आहारामध्ये भाजी सोबत कर्बोदकांचे समावेश असलेल्या चपाती रोटी किंवा पोळीचा समावेश प्रामुख्याने केला जातो. चपाती ,पोळी किंवा रोटी हे पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. भारताच्या निरनिराळ्या प्रांतांमध्ये गव्हाच्या पिठापासून रोटी किंवा चपाती बनवली जाते. चपाती आणि रोटी मध्ये मुख्य फरक म्हणजे चपाती ही गव्हाच्या पीठापासून बनवली जाते.

तर रोटी ही गव्हाच्या पिठामध्ये मैदा ,मक्याचे पीठ किंवा अन्य तत्सम पीठ मिसळून केली जाते. रोटी प्रामुख्याने तंदूरमध्ये भाजली जाते तर पोळी ही तव्यावर तेल व तूप लावून भाजतात.चपाती आणि पोळी हा एकच पदार्थ आहे की भिन्न पदार्थ आहेत याबद्दल अनेकदा चर्चा रंगत असतात. चपाती आणि पोळी हे दोन्ही गव्हापासून बनवतात.

चपाती किंवा पोळी या शब्दांना भिन्न प्रांतानुसार निरनिराळ्या पद्धतीने वापरले जाते. पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणत्याही प्रकारचे सारण न भरता  लाटलेल्या साध्या पोळीला चपाती म्हटले जाते, तर पुरणाच्या पोळीला पोळी असे म्हटले जाते. विदर्भा मध्ये गव्हाच्या पिठापासून बनवलेलया चपातीला पोळी असे म्हणतात व पुरणाच्या पोळी ला पुरणपोळी असे म्हटले जाते.

काही भागांमध्ये चपाती आणि पोळी या दोन पदार्थांमधील फरक स्पष्ट करण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या उंड्याला मध्ये तूप लावून लाटले जाते  ती पोळी होय आणि गव्हाच्या पिठाच्या उंड्याला मध्ये तूप लावले जात नाही ती  चपाती असे मानले जाते. चपातीचा भारतात उदय खूप प्राचीनकाळी झालेला आहे.

हडप्पा संस्कृती मध्ये तत्कालीन साहित्यामध्ये रोटीका या शब्दाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. हडप्पाकालीन संस्कृती मध्ये भात ,तांदूळ हे प्रमुख अन्न होते मात्र चपातीचा वापर केला जात होता हे रोटीका या तत्कालीन साहित्यामध्ये उल्लेख केलेल्या शब्दावरून समजते. आणि ऐन ए अकबरी या पुस्तकात चपाती असा उल्लेख करण्यात आला आहे.