Home » महिलांच्या जीन्सचा खिसा पुरुषांच्या खिश्यापेक्षा लहान का असतो, जाणून घ्या…!
Article

महिलांच्या जीन्सचा खिसा पुरुषांच्या खिश्यापेक्षा लहान का असतो, जाणून घ्या…!

19 व्या शतकामध्ये संपूर्ण जगभरात स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या जाऊ लागल्या‌. करिअर ,वैयक्तिक आयुष्याप्रमाणे पेहरावामध्ये सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाऊ लागले. 19व्या शतकात पुरुषांप्रमाणे स्त्रियासुद्धा पॅन्ट व जीन्स घालू लागल्या. मात्र स्त्री आणि पुरुष यांच्या पेहरावातील  फरक म्हणजे स्त्रियांच्या पॅंटला असलेले कमी व आकाराने लहान खिसे होय.

असे का याची उत्सुकता वाटू शकते व याबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत.सतराव्या शतकामध्ये स्त्री आणि पुरूष या दोघांनी आपल्या वस्तू सोबत बाळगण्यासाठी कपड्यांना एका दोरीचा वापर करत असत. या दोरीचा वापर हा आजच्या काळातील पर्सप्रमाणे असे मात्र नंतरच्या काळामध्ये स्त्रियांच्या कपड्यांमध्ये व पुरुषांच्या कपड्यांमध्ये भिन्नता निर्माण केली गेली.

पुरुषांच्या कपड्यांना खूप मोठ्या प्रमाणात खिसे निर्माण केले जाऊ लागले. स्त्रियांना मात्र आपल्या वस्तू जवळ बाळगण्यासाठी छोट्या आकाराची पर्स  घेणे भाग पाडले गेले. एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वच स्तरातून विविध चळवळी निर्माण झाल्या. स्त्रियांनी पेहरावाच्या स्वातंत्र्याच्या मागण्या सुरू केल्या. म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये  फॅशन सोबतच कंफर्टही असावे अशी मागणी स्त्रियांनी सुरू केली.

या मगणीचि परिणाम म्हणून स्त्रियांच्या कपड्यांना  छोटेसे खिसे निर्माण  केले गेले. मात्र आजही स्त्रीयांच्या कपड्यांमध्ये पुरूषांच्या कपड्यांच्या तुलनेत फॅशनला कंफर्टपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते महिलांच्या जीन्सचा खिसा पुरुषांच्या खिश्यापेक्षा लहान का असतो, जाणून घ्या…!व आजही स्त्रियांनी आपल्या गोष्टी जवळ बाळगण्यासाठी पर्स ठेवावी हा एक मतप्रवाह आहे.