Home » ऐकावे ते नव्वलच! ‘या’ गावातील बायका चक्क लग्न झाल्या झाल्या दुसऱ्याचं दिवशी जातात पळून…!
Article

ऐकावे ते नव्वलच! ‘या’ गावातील बायका चक्क लग्न झाल्या झाल्या दुसऱ्याचं दिवशी जातात पळून…!

भारतातील विकसित राज्यांपैकी एक असलेले महाराष्ट्र हे सध्या अनेक प्रतिकूल कारणांसाठी सुद्धा ओळखले जाते. यापैकीच एक म्हणजे शेतकर्‍यांची दयनीय अवस्था, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था व निसर्गाचा प्रकोप होय. महाराष्ट्रातील अनेक गावं उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याशिवाय कोरडी पडलेली दिसून येतात. माणसांप्रमाणेच प्राणी पक्षी सुद्धा पाण्यासाठी वणवण करताना दिसून येतात.

अनेक ठिकाणी शाळकरी मुलांची शाळा सुद्धा केवळ पाणी आणण्याच्या कामासाठी उन्हाळ्यामध्ये बंद ठेवल्या जातात. सर्वात जास्त व्यथा असते की घरातील गृहिणींची. अशा दुष्काळग्रस्त गावांमधील महिलांचे आयुष्य हे केवळ पाण्याच्या घागरी डोक्यावर घेऊन दिवस-रात्र पायपीट करण्यांमध्ये जाते. या परिस्थितीला स्त्रिया आपले नशीब समजून नेटाने सामोरे जातात मात्र अनेकदा आपल्या वाट्याला आलेले हे प्राक्तन न स्वीकारता त्या माघारी फिरण्याचा निर्णय घेतात.

अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील दांडिची बारी या गावांमध्ये आहे जिथे पिढ्यानपिढ्या दुष्काळ पाहिला आहे व या दुष्काळामुळे गावातील स्त्रिया आपले आयुष्य केवळ पाणी भरण्यासाठी व्यतीत करताना दिसून येतात. मात्र नवीन पिढीतील काही लग्न करून आलेल्या मुलींना अंगावरील हळद उतरण्याअगोदर गावातील दुष्काळ यामुळे होणारी ही अवस्था पाहून माहेरी परतण्याचा निर्णय घेतला.

एक नवी नवरी लग्नाच्या अवघ्या एका दिवसातच गावातील बायकांसोबत पाणी भरायला गेली असता हे पाणी भरण्यासाठी चे कष्ट पाहून हातातील कळशी तिथेच टाकून ती माहेरी निघून गेली. हे अशाच अनेक तरुणी लग्न करून आल्यानंतर काही दिवसांमध्ये दांडीची बारी या गावातील  दुष्काळाचा फेरा पाहून अवघ्या काही दिवसांमध्येच माहेरी परतत आहे त्यामुळे या गावातील तरुणांच्या लग्न जमण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

या गावांमध्ये मध्ये आपली मुलगी देण्यास पालक तयार नसतात. जुन्या पिढीतील बायका मात्र आजही या दुष्काळाशी चार हात करत आहेत ते केवळ सरकारी योजना या गावांमध्ये आत्तापर्यंत अद्यापही आल्या नाहीत म्हणून. गावाजवळ असलेल्या एका टेकडीवर एका ओहळा मधून येणाऱ्या पाण्याला भरण्यासाठी या बायका पायपीट करत दोन कळशी डोक्यावर घेऊन सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी जातात.

एक कळशी भरण्यासाठी तासन तास वाट पाहावी लागते मात्र या महिलांनी हे स्वीकारले आहे. इथून पुढच्या काळामध्ये गावातील मुलांची लग्न होतील का व गावांमध्ये नवी नवरी नांदेल का हा प्रश्नच आहे. या गावाची ही अपकीर्ती ऐकून गावातील काही मुलांनी आपले संसार दुसऱ्या गावी थाटले आहेत.