Articles Arts Featured Humor Inspirational

आयुष्यात ‘या’ रंगांचा वापर योग्य पद्धतीने करून बघा, नक्की होणार फायदा

vastushastra
vastushastra

अनेकदा आयुष्यात खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नाही. यामुळे अनेकदा माणूस आपल्या नशिबाला दोष देतो. त्यामुळं माणूस विविध प्रकारचे कृत्य करून आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र वास्तुशात्रामध्ये देखील यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. यानुसार रंगांचे देखील काही नियम सांगितले आहेत. वास्तुशात्रानुसार घरामध्ये यश नसल्यास किंवा आपल्या घरातील बजेट कोलमडलेली असल्यावर तसेच कमावायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपणास बघावे तसे यश येत नसल्यास पारिवारिक स्थिती विस्कटून जाते अश्या वेळेस देवाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या देवघरात लाल रंग लावावा.

आजच्या या लेखात आपण याच्याविषयी माहिती घेणार असून यामध्ये कोणता रंग कसा वापरल्याने आणि तो घरात कोणत्या ठिकाणी वापरल्यास त्याचा फायदा होतो हे पाहणार आहोत. याचबरोबर विविध समस्यांवर रंगाचे उपाय देखील पाहणार आहोत.

१) पण ज्या ठिकाणी आपले पाकीट ठेवतो ती जागा नेहमी लाल आणि पिवळ्या रंगाची असावी. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवून येईल. त्याचबरोबर घरात जर हा रंग नसेल तर तुम्ही तो रंगकाम करून घ्या. त्याचबरोबर जर कुणी तुमच्यावर वाईट दृष्टी ठेवून असेल तर किंवा आपला कुणी हेवा करत आहे असे जर तुम्हाला वाटले तर घरात दक्षिण दिशेस पाणी ठेवल्यास त्वरित तिथून जागा बदला. त्या जागेवर लाल आणि पिवळी मेणबत्ती लावावी. तसेच आग्नेय कोपऱ्यात लाल मेणबत्ती लावावी.

२) जर घरातील मुलीच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील तर यासाठी देखील वास्तुशात्रामध्ये रंगाचे काही उपाय सांगितलेले आहेत. यासाठी मुलीच्या झोपण्याचा खोलीच्या भिंतीचा रंग हलका ठेवावा. त्याचबरोबर पलंगावरच्या चादरीचा रंग पिवळा ठेवावा. मुलीची खोली कोपऱ्यात असावी. त्याचबरोबर अनेकदा सर्व काही ठीक करून आणि सर्व उपाय करून आणि योग्य शिक्षण असून देखील नोकरी मिळत नसल्यास देखील रंगाचे उपाय आहेत. यासाठी तुम्ही ज्यावेळी आपण साक्षात्काराला जाताना आपल्या जवळ लाल रंगाचा रुमाल बाळगा. शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालून जा. लक्षात ठेवा शक्य असल्यास लाल रंगाचा वापर जास्त करावा.

३) त्याचबरोबर आपले भविष्य उज्वल होण्यासाठी आणि नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी रात्री झोपताना झोपण्याचा खोलीत पिवळ्या रंगाचा वापर करावा. लाल, पिवळे आणि सोनेरी हे तीन रंग आपले नशीब बलवत्तर करतात. नशीब बलवत्तर करण्यासाठी या रंगाचा वापर करावा. यश मिळेल.पिवळा रंग नशिबास झळकवतो. पिवळा रंग शुभ मानला जातो.

४) तुम्ही पहिले असेल कि, लग्न कार्यात नेहमी पिवळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. असे म्हणतात की पिवळ्या रंगाचा वापर केल्याने मुलीला सासरी सौख्य मिळते.हळद ही लग्न कार्यासाठी शुभ मानली जाते. असे म्हणतात की हळदीमध्ये गणेशाचा वास आहे आणि ज्या कार्यात खुद्द गणपती आहे ते कार्य यशस्वी होणारच. कधी कधी हळदीच्या ढेकड्यात गणेशाचे चित्र सापडते. त्यामुळे नेहमी पिवळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. त्याचबरोबर देवांमध्ये देखील पिवळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. देवी लक्ष्मीने पिवळे वस्त्र धारण केले आहे. यावरून हळद किती महत्त्वाची आहे आपण असे समजू शकता.

या सर्व रंगांबरोबरच सफेद रंगाचा देखील मोठ्या प्रकारचा फायदा असून हा रंग देखील तुम्ही आयुष्यात वापरल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल.

१) पांढर्‍या रंगाचा एक फायदा सूर्यप्रकाशाशी देखील संबंधित आहे. गोष्ट अशी आहे की गडद कपडे प्रकाश अधिक शोषुन घेतात. याउलट, पांढरा रंग हा प्रकाश प्रतिबिंबित करतो. म्हणून, पांढरे कपडे परिधान केल्याने उष्णता जाणवत नाही. तसेच यामुळे त्वचेची जळजळ होण्याची समस्या उद्भवत नाही. म्हणूनच पांढर्‍या रंगाचे कपडे उन्हाळ्यात सर्वोत्तम मानले जातात.

२)दुसरा फायदा असा आहे की, पांढरा रंग आपल्या मेंदूत सकारात्मक प्रभाव टाकतो. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक म्हणून मानला जातो. या रंगला पाहून मनाला शांती मिळते आणि डोक्यावरील तणाव कमी होतो. या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपण सकारात्मक दिशेने विचार करू लागतो.

३)एका अभ्यासात, पांढरा रंग साधेपणा, चांगुलपणा आणि दयाळू स्वभावाचे प्रतीक मानला जातो. या रंगाचे कपडे परिधान केल्यावर आपल्या समोरची व्यक्ती देखील सकारात्मक आणि चांगले विचार करू लागते. हेच कारण आहे की आपण जास्तीत जास्त पांढर्‍या रंगाचे कपडे घालावे.

त्याचसोबत सफेद रंगाचे वैशिष्ट्य हे आहे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असतात.

घरासाठीच्या रंगांची दिशेनुसार निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या
रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाची जन्मतारीख या दोन निकषांवर आधारित असावी लागते. “प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो, परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तुशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच रंगांची निवड करावी.

१)ईशान्य : फिका निळा

२)पूर्व : पांढरा किंवा फिका निळा

३)आग्नेय – या दिशेचा अग्नीशी संबंध असतो, त्यामुळे भगवा, गुलाबी किंवा चंदेरी रंग वापरून येथे ऊर्जा वाढवता येते

४)उत्तर : हिरवा किंवा पिस्ता

५)वायव्य – या दिशेने वारे येतात. म्हणूनच या दिशेच्या खोल्यांचे रंग राखाडी आणि क्रीम असलेले चांगले.

६)पश्चिम – ही वरुणाची म्हणजेच पाण्याची दिशा. त्यामुळे या दिशेला सर्वात चांगले रंग म्हणजे निळा आणि पांढरा

७)नैऋत्य – पीच, मातकट , बिस्कीट किंवा हलका तपकिरी

८)दक्षिण – लाल आणि पिवळा

९)काळा , लाल किंवा गुलाबी रंग निवडताना घरमालकांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे रंग प्रत्येक व्यक्तीला पोषक नसतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.