आईसलँडमधील मुलीशी लग्न केल्यास 3 लाख 19 हजार रुपये मिळतात का? जाणून घ्या या माघील संपूर्ण सत्य

आपण आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिणी यांच्या संपर्कात राहण्यासाठी सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर नेहमीच करत असतो. फेसबुक हे यासाठी अतिशय लोकप्रिय  सोशल मीडिया माध्यम आहे .फेसबुक वर केवळ मित्र-मैत्रिणी यांच्या संपर्कात राहण्याव्यतिरिक्त सुद्धा अनेक विविध माहिती सुद्धा शेअर केली जाते .सध्या मिम्सचा जमाना आहे व फेसबुक वर विविध आशयाचे मिम्स तयार केले जातात. काही मिम्स खूप प्रचंड प्रमाणात वायरल होतात यामागचे कारण म्हणजे या मिम्स मध्ये असलेला सनसनीखेज आशय होय.

या मिम्समध्ये प्रत्येक वेळी तथ्य असेलच असे नाही .काही वेळेला केवळ एक गंमत म्हणून व्हायरल झालेले मिम हे एखादी अधिकृत बातमी आहे असे मानले जाऊ लागते व त्यातून पुढे काय परिणाम होऊ शकतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या एका प्रसिद्ध मिमद्वारे कळू शकते.आइसलँड या देशामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण हे विषम आहे . या राष्ट्रांमध्ये लोकसंख्या कमी आहे व स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे त्यामुळे स्त्रियांना लग्न करण्यासाठी वर मिळणे मुश्किल झाले आहे.

अशाच एका मिमद्वारे आपल्या राष्ट्रातील मुली किंवा महिलांसोबत अन्य देशांतील पुरुषांना विवाह करण्यासाठी आव्हान केले आहे. या राष्ट्रातील मुलींसोबत लग्न केल्यास संबंधित वराला या देशाकडून स्टायपेंड सुद्धा दिला जाईल असे या मिम्समध्ये म्हटले गेले आहे .हा स्टायपेंड तब्बल पाच हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनामध्ये तीन लाख 19 हजार इतके यास्टायपेंड चे मूल्य असेल, इतकेच नाहीतर काही संकेतस्थळांवरील बातम्यांमध्ये सुद्धा आइसलँड या राष्ट्रातील स्त्री पुरूष संख्या गुणोत्तर हे विषम असल्यामुळे पुरुषांचे प्रमाण कमी आहे व जे पुरूष येथील स्त्रियांसोबत लग्न करण्यास इच्छुक आहेत त्यांना आइसलँड येथील दूतावासात सोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

भारतामध्ये सुद्धा स्त्री पुरुष गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त आहे. स्त्रियांचे प्रमाण स्त्री भ्रूण हत्येमुळे कमी झाले आहे व त्यामुळे काही भागांमध्ये पुरुषांना विवाहासाठी मुली मिळणे मुश्कील झाले आहे अशा संदर्भात  प्रचंड व्हायरल झालेल्या मिममधील बातमी नक्कीच कोणत्याही जास्त लोकसंख्येच्या देशातील तरुणांना आकृष्ट करणारी आहे .या मिम्समधील आशय हा पूर्णपणे चुकीचा आहे याचा खुलासा स्नोप्स संकेतस्थळाने केला आहे .ही अफवा नक्की कुठून पसरली याचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला.

2016 साली स्पिरिट विस्पर्स नावाच्या संकेतस्थळाने आइसलँड या राष्ट्रांमध्ये पुरुषांच्या घटत्या संख्येमुळे या राष्ट्रातील महिलांसोबत लग्न केल्यास आइसलँडचे सरकार त्या वराला महिना पाच हजार डॉलर इतका स्टायपेंड देईल अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र या बातमीनंतर आफ्रिकेतील अनेक संकेतस्थळांनी अधिकृत माहिती म्हणून या अफवेला प्रसिद्धी दिली. या अफवेवर लोकांनी विश्वास ठेवणयामागचे प्रमुख कारण म्हणजे जगभरात असे अनेक छोटे छोटे राष्ट्र आहेत ज्यांची लोकसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे व या दृष्टीने आपल्या राष्ट्राची लोकसंख्या वाढावी म्हणून तेथील सरकार प्रयत्नशील सुद्धा आहेत. उदाहरणार्थ डेन्मार्क येथील घटत्या लोकसंख्येमुळे चिंताक्रांत होऊन तेथील सरकारने जोडप्यांना रोमांटिक सहलीं वर जाण्याचे आवाहन केले होते व अशा सहली वरून परत आल्यानंतर जर त्यांनी एखाद्या अपत्याला जन्म दिला तर त्या अपत्याचा सर्व खर्च वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत डेन्मार्कचे सरकार उचलणार होते.

या अफवेमुळे आइसलँड मधील मुलींना मात्र खूप मनःस्ताप सहन करावा लागला. त्यांना सोशल मीडियावर निरनिराळ्या देशांमधील पुरुषांकडून शेकडोंच्या संख्येने फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ लागल्या होत्या. इतकेच नव्हे तर विविध देशांमध्ये असलेल्या आइसलँड च्या दूतावासामध्ये या अफवेची शहानिशा करण्यासाठी अनेक उत्सुक तरूण जाऊ लागले होते. यामुळे अनेक आइसलँडच्या दूतावासाने आईस लँड  सरकारने अशा प्रकारची कोणतीही योजना घोषित केलेली नाहीये असे आपल्या अधिकृत फेसबुक पेज वर सुद्धा नमूद केले.

फेसबुक वर व्हायरल होत असलेल्या एका मिम्सच्या  आधारावर अनेक तरुण जणू काही गुडघ्याला बाशिंग बांधून आइसलँडच्या मुलींसोबत विवाह करण्यास उतावीळ झाले होते. मात्र आइसलँड राष्ट्राची संस्कृती पाहिली तर याठिकाणी विवाहाला फारसे महत्त्व दिले जात नाही. विवाह न करता याठिकाणी स्त्री-पुरुष एकत्र राहू शकतात व मुलांना जन्मही देऊ शकतात. यामुळे साधारण 67% मुलं ही अविवाहित स्त्री-पुरुषांच्या संबंधांमधून जन्माला आली आहेत व त्यांना तेथील समाजातून मान्यताही मिळते म्हणूनच या ठिकाणी मुलांना जन्म देण्यासाठी व लोकसंख्या वाढवण्यासाठी विवाह करणे अनिवार्य मानले जात नाही व केवळ लोकसंख्या वाढविण्याच्या हेतूने आइसलँड राष्ट्र अशा प्रकारची घोषणा करू शकते हे किती फोल आहे हे सिद्ध होते. आइसलँड हे राष्ट्र अतिशय सुखी व समाधानी असे राष्ट्र आहे .जागतिक स्तरावर जाहीर होणाऱ्या हॅपिनेस इंडेक्स मध्ये  या राष्ट्राने नेहमीच दहापैकी 7.5 इतका गुणांक कायम ठेवला आहे.

 सरतेशेवटी राहिला प्रश्न या मिम च्या निर्मितीचा. सर्वात प्रथम आइसलँड च्या संदर्भात व्हायरल झालेल्या बातमीचा स्त्रोत म्हणजे स्पिरिट व्हिस्पर्स या या संकेत स्थळाच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होते. या संकेतस्थळाने ज्याप्रमाणे 2016 साली  आइसलँड राष्ट्रा मधील  मुलांच्या घटत्या संख्येमुळे या राष्ट्रातील मुलींसोबत विवाह करणाऱ्या मुलांना पाच हजार रुपये डॉलर इतका दरमहा स्टायपेंड देण्यात येईल  अशी बातमी दिली होती त्याच संकेतस्थळाने काही दिवसांपूर्वी यूएई मधील मुलींच्या घटत्या लोकसंख्येमुळे या देशातील पुरुषांसोबत विवाह करणाऱ्या मुलींना युएईचे सरकार एक लाख 19 हजार डॉलर इतका स्टायपेंड देणार आहे अशी बातमी दिली होती. यावरूनच या दररोज प्रसारित होणाऱ्या मिम्स मागील खोटेपणा जाहीर होतो.