Articles Festival Inspirational Religion

गणपती बाप्पाला अजिबात आवडत नाहीत ‘या’ गोष्टी; पालन न केल्यास नुकसान नक्की होणार

ganpati
ganpati

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करतो.महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपती ओळखला जातो. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किमान नामस्मरणाने करतो. त्यामुळे सर्व देवांमध्ये महत्वाचा आणि सर्वात ताकदवर देव म्हणून गणपतीची गणना केली जाते. गणपती हे सर्वात पराक्रमी देवांपैकी एक मानले जातात. अगदी गणेश पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. चार वेद, चार उपवेद, सहा वेदांगे मिळून तयार झालेल्या चौदा विद्या आणि कला या शब्दाचे विषय व्यापकत्व लक्षात घेऊन निश्चित करण्यात आलेल्या चौसष्ठ कलांचा तो अधिपती आहे.

गणपती हा अतिशय क्रोधीत असल्याचे देखील अनेक पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे. गणपती हा विद्यांचा देव आहे. त्याचबरोबर तो समाजसंघटक आहे. त्याचबरोबर तो ओंकारस्वरूप देखील आहे. मात्र या अशा विद्यापती गणपतीला काही गोष्टी मात्र अजिबात आवडता नाहीत. त्यामुळे अनेकदा तो क्रोधीत होतो. त्यामुळे गणपती बाप्पा क्रोधीत झाल्यानंतर अशा व्यक्तींना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणात यासंदर्भात काही दाखले दिले जातात. गणपतीला न आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग केल्यास गणपतीची शाश्वत कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगणार असून तुम्हाला नक्कीच हि माहिती आवडेल.

१)​परशुराम-गणपती युद्ध
गणपती बाप्पाला अहंकार अजिबात आवडत नाही. गणपतीचे शुभाशिर्वाद प्राप्त करून घ्यावयाचे असतील, तर आपल्यातील अहंकार प्रथम संपुष्टात आणला पाहिजे. विष्णूंचे अवतार मानल्या गेलेल्या चिरंजीव परशुराम यांनाही एकदा अहंकाराने ग्रासले. गणपती बाप्पाने परशुरामांचा अहंकार संपुष्टात आणला. पुराणात यासंदर्भातील कथा आढळते. महादेवांची भेट घेण्यासाठी परशुराम कैलासावर गेले होते. मात्र, गणपतीने त्यांना रोखले. महादेवांची आज्ञा प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी आपणास पुढे जाऊ देऊ शकत नाही, असे गणपतीने सांगितले. गणपती ऐकत नाही म्हटल्यावर परशुराांचा क्रोध अनावर झाला आणि ते युद्धाला उभे राहिले. गणपतीने परशुरामांना मोठे आव्हान दिले. शेवटी आपल्या परशुने त्यांनी गणपतीवर जोरदार प्रहार केला. यात गणपतीचा एक दंत निखळला. तेव्हापासून गणपती एकदंत नावाने ओळखला जातो. परशुरामांच्या अहंकाराचा समाचार घेण्यासाठी गणपतीने परिस्थिती युद्धापर्यंत नेली. यामुळे ज्या व्यक्तीला अहंकाराने ग्रासले जाते त्याला गणपती बाप्पा नेहमी धडा शिकवतात असे सांगितले जाते.

२)​कुबेराचा खजिना रिकामा
अनेकदा व्यक्तींना आपल्या संपत्तीचा गर्व चढतो. नेहमी आपण गर्वाचे घर खाली असे म्हणत असतो. कुबेराला सर्वात श्रीमंत समजले जाते. मात्र याच कुबेराला आपल्या संपत्तीचा आणि श्रीमंतीचा गर्व झालेला असताना गणपतीने चांगलाच धडा शिकवला होता. याविषयी देखील पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. एकदा कुबेराने आपल्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी महादेवांना भोजनासाठी आमंत्रित केले. मात्र आपल्याऐवजी गणपती भोजनाला येईल असे महादेवांनीत्यांना सांगितले. त्याप्रमाणे गणपती कुबेराकडे आपल्या मूषकासह पोहोचले. यावेळी कुबेराने बनवलेले भोजन गणपतीने फास्ट केले. मात्र त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या वस्तूही गिळंकृत करायला लागले. शेवटी घाबरून कुबेर पार्वती देवीला शरण गेले. पार्वतीने कुबेरांजवळ गणपतीला खाण्यासाठी एक मोदक पाठवला. एक मोदक खाताच गणपतीचे पोट एकदम भरले. तेव्हा एका बालकाला पोटभर जेवण देऊ शकत नाही, तर तुमच्या ऐश्वर्याचा, वैभवाचा काय फायदा, असे खडे बोल गणपतीने सुनावले. या एका वाक्यामुळे कुबेरांचा सगळा गर्व गळून पडला. मात्र त्यानंतर गणपतीची क्षमा मागितल्यानंतर गणपतीने कुबेराला त्याची सर्व संपत्ती पुन्हा परत दिली.

३)​महादेवांशी युद्ध
कोणत्याही व्यक्तीने केलेले अमर्याद व्यवहार गणपतीला अजिबात पसंत नाही. यामुळेच गणपतीने थेट महादेवांसोबत युद्ध केले. या विषयी देखील एक कथा सांगितली जाते. यामध्ये एकदा देवी पार्वतीने खूप कष्टाने एक मूर्ती घडवली आणि त्यामध्ये प्राण फुंकले. त्यानंतर देवी पार्वतीने त्याला म्हणजेच गणपतीला प्रवेशद्वारावर पाहारा देण्यासाठी बसवले. महादेवांना पार्वती देवीची भेट घ्यायची होती. मात्र, गणपतीने त्यांना रोखले. शिवाने जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गणपती त्यांच्यासमोर उभे ठाकले. महादेवांना क्रोध अनावर झाल्यावर त्यांनी गणपतीशी युद्ध पुकारले. मात्र, आपल्याच पुत्राशी आपण युद्ध करताहोत, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता कि, गणपतीने ठरवले तर तो आपल्या धर्मपित्याशी देखील युद्ध करू शकतो.

४)​सर्व शक्तींचा क्षय
जी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देते, कष्ट देते, अशा व्यक्तींवर गणपतीची कधी कृपा होत नाही. त्यामुळे गणपती नेहमी योग्य व्यक्तीच्या मागे उभा राहतो हे यातून स्पष्ट होत आहे. एकदा गणपतीने मूषकासुर नामक दैत्याला धडा शिकवला. मूषकासुर खूपच उपद्रवी होता. तो सर्वांनाच त्रास देत असे. त्यामुळे सर्वांनी मिळून गणपतीला शरण गेले. यावेळी त्यांनी आपला त्रास गणपतीला सांगितला. त्यानंतर गणपतीने मूषकासुराला धडा शिकवत आपले वाहन बनवले. त्याचबरोबर त्याच्या सर्व शक्तींना देखील नष्ट करत आपल्या वषमध्ये केले.

५)​गणेशाचा शाप
कोणत्याही प्रकारचे शुभाशीर्वाद पाहिजे असतील तर चुकीच्या मार्गाने गणपतीची आराधना करू नये. उपासना, आराधना, नामस्मरण या माध्यमातून गणेशचे शुभाशिर्वाद प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही मोहात वा प्रलोभनात पडू नये, असे सांगितले जाते. याविषयी एक कथा सांगितली जाते कि, एकदा गणपती ध्यानाला बसले असताना तेथून तुलसी देवी जात होती. यावेळी गणपतीचे मनमोहक रूप पाहून तुलसी देवी मोहित झाली आणि तिने गणपतीपुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र गणपतीने हा प्रस्ताव नाकारला. यामुळे तुलसी देवीने क्रोधीत होऊन गणपतीला तुमचे दोन विवाह होतील असा शाप दिला. मात्र तिच्या या शापाने गणपती देखील क्रोधीत झाले आणि त्यांनी तुलसी देवीला देखील शाप दिला. तुमचा एक विवाह असुराशी होईल, असा तुलसी देवींना शाप दिला. या शापामुळे तुलसी देवी भयभीत झाल्या. त्यांनी गणपतीची क्षमायाचना केली. यावर शंखचुर्ण दैत्याशी आपला विवाह होईल. आणि विष्णूच्या पूजेत तुम्हाला वरचे स्थान मिळेल असा आशीर्वाद देखील गणपतीने त्यांना दिला.

About the author

Being Maharashtrian