Articles Featured Festival Religion

घरातील गणपतीची ‘अशी’ काळजी घेतल्यास तुम्हाला नक्कीच मिळणार शुभ फळ : अशा पद्धतीने हवी गणेशमूर्ती आणि फोटो

ganpati office
ganpati office

देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक मंगल कार्यात त्याला प्रथम स्थान मिळालेला आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करतो.महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपती ओळखला जातो. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किमान नामस्मरणाने करतो. त्यामुळे सर्व देवांमध्ये महत्वाचा आणि सर्वात ताकदवर देव म्हणून गणपतीची गणना केली जाते. गणपती हे सर्वात पराक्रमी देवांपैकी एक मानले जातात. अगदी गणेश पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. गणपती जल तत्त्वाचे अधिपती आहे.

भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि दर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीची उपासनेचे मुख्य सण-उत्सव. त्यामुळे प्रमाणात गणपतीची प्रत्येक घरात पूजा केली जाते. भारतातील प्रत्येक कुटुंबात गणपतीची मूर्ती अथवा फोटो हा आपल्याला आढळतोच. धर्मीयांमध्ये गणपतीला विशेष स्थान आहे. दररोज गणपतीची घरात पूजा केली जाते. मात्र गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणपतीची स्थापना केली जाते. सर्वधर्मियांमध्ये गणपतीविषयी आस्था, प्रेम, श्रद्धा असल्याचे दिसून येते. विघ्नहर्ता गणेशाची घरात स्थापना करताना काळजी घेण्याबाबत वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. वास्तुदोष निवारण्यातही गणेश मूर्ती, प्रतिमा यांचे विशेष महत्त्व असल्याचे वास्तुशास्त्र मानते.

केवळ घर नाही, तर कार्यालय, दुकान, कारखाना, प्रकल्प या ठिकाणी वास्तु यंत्रांसोबत गणेशाचीही विभिन्न रुपात स्थापना केली जाते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलेली आढळून येईल. सुख, शांतता, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करण्याचा त्यामागील उद्देश असतो. मात्र, वास्तुदोषासाठी गणेश स्थापना करताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र यामागे वास्तुशात्रात सांगितलेल्या काही गोष्टींचा देखील समावेश आहे. आजच्या लेखात आपण यामागील कारणे आणि गोष्ट समजावून घेणार असून आम्ही तुम्हाला याविषयी महत्वाची माहिती सांगणार आहोत.

१)स्वस्तिकरुपी गणेश
वास्तुदोष निवारण्यातही गणेश मूर्ती, प्रतिमा यांचे विशेष महत्त्व असल्याचे वास्तुशास्त्र मानते. केवळ घर नाही, तर कार्यालय, दुकान, कारखाना, प्रकल्प या ठिकाणी वास्तु यंत्रांसोबत गणेशाचीही विभिन्न रुपात स्थापना केली जाते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलेली आढळून येईल. सुख, शांतता, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करण्याचा त्यामागील उद्देश असतो. व्यापार, व्यवसाय किंवा उद्योगात वारंवार मंदी येत असल्यास गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करणे लाभदायक ठरते. त्यामुळे तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळते. मात्र जर तुम्हाला गणेशाची मूर्ती, प्रतिमा स्थापन करणे शक्य नसल्यास ताम्रपत्रावरील स्वस्तिक स्थापित करावे. गणपतीची मूर्ती, प्रतिमा किंवा ताम्रपत्रावरील स्वस्तिक जे काही स्थापन केले जाईल, त्याचे नियमितपणे पूजन करावे. असे केल्याने तुम्हाला ज्या अडचणी येत असतात किंवा तुमच्यावर जे संकट असते ते दूर होते.

२)गृहप्रवेश
एखाद्या नवीन घरात किंवा जुन्या पण वापरात नसलेल्या घरात गृहप्रवेश करताना गणपतीची स्थापना करण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. घरातील प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस, घरात प्रवेशद्वाराकडे नजर जाईल, अशा स्वरुपात गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण तयार होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना देखील याचे फळ मिळून तुमच्या आयुष्यतील सर्व गोष्टीत याचा तुम्हाला फायदा होतो.

३)तुळस आणि गणपती
घरातील तुळशीजवळ गणपतीची स्थापना करणे शुभ मानले जाते. दररोज किंवा नियमितपणे तुळशीचे आणि गणपतीचे पूजन करावे. गणपतीची प्रतिमा तुळशीच्या अधिक लांब ठेऊ नये. गणपती आणि तुळशीच्या आशीर्वादाने घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते. त्याचबरोबर घरातील सर्व समस्या दूर होतात. याचबरोबर तुळस आरोग्याच्या दृष्टिनेही अत्यंत उपयुक्त असते. तुळशीचे धार्मिक, आध्यात्मिक, आरोग्यदायी महत्त्व सर्वश्रुत आहेच. त्यामुळे घरामध्ये नेहमी तुळस आणि गणपतीची मूर्ती अथवा फोटो असावा.

४)दक्षिणमुखी द्वार
वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य दरवाज्याविषयी देखील अनेक नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे प्रवेशद्वार जर दक्षिण दिशेला असेल, तर ते दक्षिणमुखी भवन नावाने संबोधले जाते. दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वारामुळे घरात काही समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी घरातील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस आत व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. यामुळे तुमची समस्या दूर होऊन तुम्हाला हवे असणारे फळ नक्कीच मिळेल. त्याचबरोबर गणपती स्थापनेमुळे वास्तुदोष दूर होतो. काही दिवसातच फलप्राप्ती होण्यास सुरुवात होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मात्र, गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती ही मध्यम आकाराची असावी, ती अधिक लहान किंवा अधिक मोठी नसावी, असे सांगितले जाते.

५)तोरण
वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची छबी असलेले तोरण प्रवेशद्वारावर बांधणे शुभ मानले जाते. सण-उत्सव, व्रत-वैकल्यांच्या काळात गणेशाची छबी असलेल्या तोरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते. वास्तुशास्त्रात याला अत्यंत शुभ मानले गेले आहे. यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्या घराला इतरांची नजर लागण्यापासून देखील सरंक्षण होते. मात्र हि तोरण लावलेली जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. तोरणावर धूळ किंवा मातीचा थर जमू देऊ नये, असे सांगितले जाते. त्याचबरोबर हे तोरण अथवा गणपतीची छबी असलेला फोटो दररोज स्वच्छ ठेवावा. यामुळे गणपती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला नक्कीच चांगले फळ देईल.

त्याचबरोबर आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. वास्तुशास्त्रामध्ये याला देखील मोठे महत्व आहे. या गोष्टींचे नियमित पालन केल्यास तुम्हाला जीवनात कोणतीही अडचण किंवा समस्या येणार नाहीत.

१)रात्री जेवण झाल्यानंतर उष्टे भांडे सिंकमध्ये नाही ठेवायला पाहिजे, याने लक्ष्मी रुसते.

२) कचऱ्याचा डब्बा घराच्या मुख्य दारासमोर ठेवू नये, असे केल्याने देखील घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.

३)सूर्यास्त नंतर कधीही दूध, दही आणि कांदा नाही द्यायला पाहिजे, असे केल्याने भाग्य तुमचा साथ देत नाही.

४)लोक नेहमी आनंदाच्या क्षणात मिठाई वाटतात पण ज्योतिष शास्त्र म्हणत की प्रत्येक २ महिन्यात ऑफिसमध्ये आपल्या सहकार्‍यांसोबत मिठाई वाटून त्याचे सेवन करायला पाहिजे, याने प्रगतीचा मार्ग खुलतो.

५) महिन्यातून एकवेळा घरात जरूरी खीर बनवा आणि लक्ष्मीला त्याला प्रसाद म्हणून द्या व नंतर घरातील लोकांबरोबर मिळून त्याचे सेवन करा, याने घरात दरिद्रता येत नाही. झोपण्याअगोदर बाथरूम आणि किचनमध्ये एक बालंटी पाणी भरून ठेवा, याने धनलाभ होईल सोबतच प्रगतीचा मार्ग देखील उघडेल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.