Actors Actress Articles Featured

नाना पाटेकर यांच्या आईने घेतला नसता ‘हा’ निर्णय तर आज ते झाले असते कुख्‍यात गुन्हेगार…

nana patekar
nana patekar

भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर. त्यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हे एक उत्तम अभिनेते आहेत, याविषयी कुणाच्या मनात शंका असू नये. त्याचबरोबर बिनधास्त आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. नानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना ‘नाम’ या संस्थेमार्फत मदत केली. नाना सामाजिक तसेत राजकिय सर्वत्र बाबतील रोखठोक मत मांडतात. नानांच्या फिल्मी करिअर आणि सामाजिक कार्याविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे. त्याचबरोबर नाना पाटेकर यांच्या वैयिक्तक आयुष्याबद्दल अनेकांना काही गोष्टी ठाऊक नसतील.

प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याची चिंता असते. मात्र आज नाना पाटेकर ज्या ठिकाणी आहेत त्यामध्ये त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे. एक आई कशा प्रकारे मुलाचे भविष्य बदलवते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना पाटेकर यांची आई. मात्र नाना पाटेकर यांच्या आईने जर एक महत्वाचा निर्णय घेतला नासता तर आज नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमध्ये नव्हे तर वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले असते.

नाना पाटेकर यांची जीवनी
नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. त्याचबरोबर नाना पाटेकर यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. आज ते ज्या ठिकाणी आहेत त्यामध्ये त्यांच्या आईच्या या निर्णयाचा फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांच्या या संघर्षाने आज बॉलिवूडमध्ये त्यांची वेगळी ओळख आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. त्यामुळे तुम्ही अंदाज बांधलाच असेल कि, सुर्वे आडनावाचे नाना पाटेकर यांच्याबरोबर काही कनेक्शन आहे का? तर तुमचा विचार योग्य दिशेने जात आहे. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. मात्र नाना पाटेकर यांचे वडील कामानिमित्त मुंबईतच राहिले. त्यामुळे कोकणात नाना पाटेकर याना फार हलाखिमध्ये दिवस काढावे लागले. या निर्णयामागे त्यांच्या आईचा खूप मोठा योगदान होते. अवती भोवती गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असताना नाना मात्र संस्‍कारी झाले. त्‍यांना साधी चोरीही करावीशी वाटली नाही. ते केवळ त्‍यांच्‍या आईच्‍या संस्‍कारामुळेच नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

या कारणामुळे नानांच्या आईने त्यांना कोकणात नेले
मन्या सुर्वे आणि त्याचा सख्खा भाऊ भार्गव सुर्वे हे दोघेही मुंबईमधील कुख्यात डॉन होते. मामाची मुले असल्यामुळे नाना पाटेकर यांचा देखील त्यांच्याशी संबंध यायचा. त्‍यामुळे नानाही त्‍यांच्‍या नांदी लागेल, ही भीती त्‍यांच्‍या आईला कायम होती. त्‍यातूनच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुरूड जंजिऱ्याला शिकायला नेले. मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर ‘शुट आऊट अॅट वडाळा’ हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी जगतात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती. मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

नाना पाटेकर यांच्या कार्याबद्दल आणि चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘अग्निसाक्षी’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.त्याचबरोबर अनेक चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.