Articles Featured Health

मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्यास मिळतात हे महत्वाचे फायदे : सहावा फायदा तर खूपच महत्वाचा

मध आणि लिंबू हे खरेतर आपल्या दररोजच्या वापरातील पदार्थ. सगळ्यांच्या घरात मध आणि लिंबू असतोच. मधाचा वापर आपण फार कमी करतो, अगदी स्पेशल डिश बनवतानाच आपण मधाची बाटली खोलतो. त्यातल्या त्यात ते मध अगदी अस्सल असले तर आई अगदी जपून ते वापरते. लिंबाचा वापर हा सतत होत असला तरी गरजेपुरताच होत असतो. काहीजण दररोज लिंबाचे सेवन करत असतात तर काहीजण केवळ कधीतरी याचे सेवन करत असतात. घरात नॉनव्हेज बनले असेल तर लिंबाचा वापर होतो तर कधी उन्हाळ्यात लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो.

आजच्या लेखात आम्ही तुम्हाला या दोन्ही पदार्थांच्या एकत्रित सेवनाने होणाऱ्या फायद्याविषयी सांगणार आहोत. आजवर तुम्हाला माहित नसणाऱ्या या फायद्यांबद्दल जाणून तुम्हालादेखील धक्का बसेल. या पदार्थांचा फक्त गरजेपुरताच वापर करणार नाही तर स्वत:चे आयुष्य सुदृढ राखण्यासाठी रोज याचा वापर कराल. चला जाणून घेऊया काय आहेत मध आणि लिंबाचे लाभ जे आजपर्यंत तुम्हाला माहितच नव्हते.

१) शरीरातील ऊर्जा वाढविते: लिंबाचा सुगंध एक नैसर्गिक शांती मिळवुन देणारा म्हणून देखील ओळखला जातो आणि आपले चित्त प्रसन्न व आनंददायी ठेवण्यास मदत करते. मध एक त्वरित ऊर्जा वाढविणारे नैसर्गिक अन्न आहे! पाणी आणि लिंबू पाचन तंत्र सक्रिय करते आणि शरीराला जुन्या विषाणूंपासून मुक्त करण्यास मदत करते जे बहुधा थकव्याचे कारण असते. या नैसर्गिक पेयाने दिवसाची सुरुवात केल्याने आपल्याला कॉफी आणि इतर उर्जा पेये वगळता येतील आणि पुढे आपल्या दिवसाची स्फुर्तीने सुरुवात होईल.

२) मौखिक आरोग्यासाठी: लिंबू हे मौखिक दुर्गंधी नष्ट करू शकते! लिंबाचा रस तोंड स्वच्छ करते, लाळेच्या ग्रंथीस सक्रिय करते आणि घातक जीवाणू नष्ट करतो. सकाळी सर्वप्रथम हे पेय पिल्यास तोंडात असलेले बॅक्टेरिया धुण्यास मदत करते.

३) रोगप्रतिकार शक्ती वाढते: रोगप्रतिकारक क्षमता ज्याला इम्युनिटी सुद्धा म्हणतात ती वाढविण्यासाठी मधाचे सेवन करावे हा उपाय तुम्ही अनेकदा ऐकला असेल पण जीवनसत्त्व क ने परिपूर्ण असलेला लिंबू देखील यात तुमची मदत करू शकतो. लिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमालीची सुधारत असल्याचा निष्कर्ष अनेक संशोधनातून पुढे आला आहे. पण याच लिंबाच्या रसाचे सेवन तुम्ही मधासोबत केले तर रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट चांगली प्रभावी होऊ शकते. म्हणून त्यामुळे जर तुम्हाला अनेक रोगांपासून आपल्या शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर आवर्जून लिंबाच्या रसात मध मिसळून प्या.

४) हृदय रोगांपासून बचाव: अनेक जाणकार सुद्धा तरुण वर्गाला मध आणि लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला देतात जेणेकरून आतापासूनच हृदय स्वस्थ असले तर हृदय रोगाचा धोका उद्भवणार नाही. पण यापासून तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर लिंबू आणि मध याचे एकत्रित सेवन करा. यातील पोषक तत्वे तुम्हाला हृदयाच्या गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे कार्य करतील. सध्या भारतात हृदय रोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. दरवर्षी भारतात लाखो लोक हृदय रोगाने मृत्यूला बळी पडतात. याला अर्थातच कारणीभूत आहे चुकीची आहार आणि जीवनशैली! आहाराचा आणि इतर दैनंदिन गोष्टींचा ताळमेळ नसल्याने हृदय रोगाची समस्या उद्भवते. अनेक जाणकार सुद्धा तरुण वर्गाला मध आणि लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला देतात जेणेकरून आतापासूनच हृदय स्वस्थ असले तर हृदय रोगाचा धोका उद्भवणार नाही.

५) रक्तदाब नियंत्रित राहतो: रक्तदाब ही एक अतिशय मोठी समस्या आपल्या भारतीयांपुढे उभी ठाकली आहे. मात्र यावर एक रामबाण उपाय म्हणून लिंबू आणि मधाचे सेवन केल्यास त्यात असणारे मॅग्ने-शियम आणि पोटॅ-शियम सारखे मिनरल्स रक्तदाबाला दूर ठेवतील आणि आरोग्य अधिक सुदृढ होईल. पूर्वी रक्तदाबाची समस्या केवळ वृद्ध व्यक्तींमध्ये दिसायची पण आता तरुण वर्गातही रक्तदाब फोफावला आहे. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि मनुष्याचे आयुष्य धोक्यात होते.

६) मूड बुस्ट करण्यासाठी: शरीरासोबत मन सुद्धा थकते आणि मूड ऑफची समस्या उद्भवते. तुम्ही घरच्या घरी सुद्धा लेमन टी बनवू शकता किंवा ते शक्य नसल्यास एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस पाण्यात घेऊन त्याचे सेवन करा. सतत काम करत राहिल्याने मानसिक ताण निर्माण होतो. अशावेळी तुम्ही मध आणि लिंबू यांचे सेवन केल्यास तुमचा मूड बुस्ट होतो. अनेक संशोधनातून सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली असून जगभरातील लोक लेमन टी विथ हनी याच कारणामुळे पितात. यामुळे सगळा ताण निघून जातो. अगदी फ्रेश वाटते.

७) वजन कमी करण्यासाठी: वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध गरम पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता. वजन कमी करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय असल्याचे गेल्या काही वर्षांत सिद्ध झाले आहे. अनेक जाणकारांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की वाढत्या वजनामुळे टाईप 2 डायबेटीस आणि अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढीस लागतो. म्हणून या वाढत्या वजनाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितकी काळजी घ्यायला हवी.

८) त्वचेकरिता उपयोगी: लिंबाचे पाणी पिण्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि नवीन रक्तपेशींच्या निर्मितीस मदत होते ज्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन सौंदर्य अबाधित राहते. मध लिंबाचे पाणी नियमितपणे घेतल्यास त्वचेवर विशेष लाभ दिसून येतात.हे पेय त्वचेसाठी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि कोलेजन-बूस्टर म्हणून कार्य करते.

About the author

Being Maharashtrian