Articles Food & Drink Health

…म्हणून गावरान अंडी बॉयलर अंड्यांपेक्षा जास्त चांगली असतात.

A white bowl of fresh brown and white eggs on a wooden bamboo surface

आधुनिक जीवनशैली ही जणू काही हायब्रीड जीवनशैली मानली जाते या हायब्रीड जीवनशैलीमध्ये सकस आहार व नैसर्गिक स्वरूपामध्ये उपलब्ध होणारे पोषक घटक कमी प्रमाणात मिळतात असे खूपदा म्हटले जाते. निक्रुष्ट आहार व पोषण मूल्यांच्या अभावी निरनिराळे आजार निर्माण होतात. आपले शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्यासोबतच निरनिराळे पोषण घटक आहाराद्वारे शरीरामध्ये कसे जातील याची काळजी घेतली जाते. सकस आहार म्हणून सध्या अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे याला कारण म्हणजे अंडी ही अन्य मांसाहारी पदार्थ पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतात.अंड्यामधून कॅल्शियम ,फॉस्फरस व प्रथिने मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात .

अंडी अन्य मांसाहारी पदार्थांच्या प्रमाणात पचायला हलकी असतात. आपल्या शरीरातील हाडे व सर्वच अवयवांसाठी जणू काही अंडी हे वरदानच ठरते. बाजारामध्ये अनेक प्रकारची अंडी उपलब्ध आहेत. मधल्या काळामध्ये आयुर्वेदिक अंडीसुद्धा निर्माण केले गेली होती.  मात्र फार पूर्वीपासून पांढरी अंडी व तपकिरी अंडी प्रामुख्याने खाल्ली जातात. बॉयलर अंडी व गावरान कोंबडीची गावठी किंवा गावरान अंडी हे ते दोन प्रमुख प्रकार होत. यामध्ये बॉयलर अंडी हे गावरान कोंबडीच्या अंड्यापेक्षा किमतीला स्वस्त असतात. गावरान कोंबडीची अंडी बॉयलर कोंबडी च्या तुलनेत महाग असण्यामागचे एक कारण असे सांगितले जाते की गावरान कोंबडी चे अंडे हे बॉयलर कोंबडी अंड्यापेक्षा जास्त पौष्टिक असतात त्यामुळे त्याची किंमत जास्त असते.आज आपण काही प्रमुख घटकांच्या आधारे बॉयलर अंडी आणि गावठी अंडी यांची ओळख करून घेणार आहोत.

बॉयलर अंड्यांचा रंग पांढरा असतो तर गावरान कोंबडीच्या अंड्यांचा रंग तपकिरी असतो। गावरान अंड्यांचा तपकिरी रंग हा निसर्गतः असतो.

गावरान अंडी देणाऱ्या कोंबडीची पैदास ही संपूर्णतः नैसर्गिक वातावरणामध्ये होते. या कोंबड्यांना दिला जाणारा खुराक नैसर्गिक पद्धतीने दिला जातो व त्यांना जलद वाढीसाठी किंवा अधिक प्रमाणात अंड्याचे उत्पादन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे हार्मोन्स इंजेक्शन्स दिली जात नाही. याउलट बाँयलर कोंबड्यांना अधिक उत्पादनासाठी निराळ्या प्रकारची औषधे इंजेक्शन लिहून दिली जातात.बॉयलर कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या हार्मोन इंजेक्शनचा प्रभाव हा त्यांचे सेवन केल्यानंतर आपल्या शरीरावर होत नाही मात्र त्याचे पोषणमूल्य हे गावरान कोंबडीच्या अंड्यापेक्षा साधारण दहा ते पंधरा टक्के कमी असल्याचे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

गावरान कोंबडी ची पैदास संपूर्ण नैसर्गिक वातावरणात होत असल्यामुळे कोंबड्यांचा खुराक जास्त असतो व नैसर्गिक पद्धतीने त्यांची वाढ घडवून आणण्याकरता निश्चितच खर्चही जास्त येतो त्यामुळेच कदाचित गावरान कोंबडीची अंडी महाग.असावी.

बॉयलर कोंबडी ची अंडी खाल्ल्यामुळे त्यातील आर्टिफिशियल केमिकलचा प्रभाव प्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर पडत नाही व यामुळेच बॉयलर अंडे यांच्या सेवनामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही  म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असेल त्याप्रमाणे गावरान अंडी किंवा बाँयलर अंडी या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारच्या अंड्याचे सेवन केले तरीही शरीराला त्यामधून कमी-अधिक प्रमाणात पोषण हे मिळते.