‘या’ चुकीच्या सवयींमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो परिणाम. तिसरी सवय तर जवळपास सर्वांनाच असते.

‘या’ चुकीच्या सवयींमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो परिणाम. तिसरी सवय तर जवळपास सर्वांनाच असते.

आपलं व्यक्तिमत्व, शरीर चांगलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. अनेकजण यासाठी विविध गोष्टी तसेच उपायदेखील करून पाहतात. यामध्ये काहींना यश मिळतं तर काहींना अपयश येतं. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण ‘कोणत्या चुकीच्या सवयींमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते’, याविषयी माहिती पाहणार आहोत.

अंमली पदार्थांचे सेवन : तंबाखू, सिगारेट, गांजा, कोकेन, ड्रग्ज, दारू इत्यादी पदार्थांचा नशा केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर याचा दिवसेंदिवस विपरीत परिणाम होत जातो. या गोष्टींचे व्यसन करताना आपल्या मेंदूची तसेच शरीराची कार्यक्षमता कमी होत चालली आहे, हे व्यसन करणाऱ्याच्या लक्षातसुद्धा येत नाही.

मसालेदार, तेलकट भोजन : जास्त मसालेदार अन्न त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ नियमितपणे खाल्यास अंगावर चरबी साचते आणि शरीराचा सुस्तपणा वाढतो. पर्यायाने मेंदूदेखील सुस्त होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे अशा पदार्थांचे अति प्रमाणात सेवन न करता संतुलित आहार घेण्याला प्राधान्य देणे योग्य ठरते.

पॉर्न पाहणे : प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यामध्ये वाजवी दरात इंटरनेट उपलब्ध झाल्याने पॉर्न अर्थात अश्लील व्हिडिओ बघणे आता सामान्य झाले आहे. मात्र त्यामधील उत्तेजना देणारी दृश्य बघितल्याने आणि त्याची सवय झाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्याचप्रमाणे पॉर्नच्या व्यसनाचा परिणाम लैंगिक आयुष्यावरही होतो. 

पठडीतले जगणे : आयुष्यात नेहमी त्याच-त्याच गोष्टी केल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर सीमा येतात. कामात, जीवनशैलीत बदल न केल्यास मेंदूला नियमित घडणाऱ्या गोष्टींची सवय होते. याउलट नवीन काही करण्याचा प्रयत्न केल्यास मेंदू जागृत होतो आणि त्याची कार्यक्षमता वाढते असे काही तज्ज्ञ सांगतात.