Articles Education Featured Inspirational Uncategorized

‘या’ विशिष्ट कारणामुळे देशासाठी काम करणाऱ्या श्वानांना मारून टाकले जाते

army dog
army dog

आर्मीतील श्वान आपल्या देशांची सेवा एखाद्या सैनिकाप्रमाणे करतात. कितीतरी हल्ले या श्वानांच्या मदतीने हाणून पाडण्यात आले आणि कितीतरी गुन्हेगारांना त्यांनी पकडून दिलंय. पण हे वाचून तुम्हाला धक्का बसेल की, या श्वानांना तोपर्यंत जिवंत ठेवलं जातं जोपर्यंत ते सैन्यात काम करतात. ते रिटायर झाल्यावर त्यांना मारलं जातं. याविरोधात अनेक एनजीओंनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र आता केंद्र सरकार देखील यावर विचार करत आहे. हे श्वान देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र या श्वानांसाठी देखील काही महत्वाचे नियम आणि अटी आहेत. त्यानंतर या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आता एडिशनल सॉलीसिटर जनरल संजय जैन यांनी सहा महिन्याच्या आता या संदर्भात योजना बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता लवकरच या श्वानांना विश्रांती मिळणार आहे. विदेशात या श्वानांसाठी खास दत्तक योजना आहे. मात्र आपल्या देशात अशी कोणतीही योजना नसल्यामुळे या मुक्या प्राण्यांवर अन्याय केला जात असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये २००९ ते १३ दरम्यान ३१८ श्वानांना दत्तक देण्यात आलं तर २८८ श्वानांना आरोग्य खराब असल्याने मारण्यात आलं. भारतातील अनेक राज्यांमध्ये पोलिसांच्या श्वानांना त्यांच्या ट्रेनर्सना दत्तक दिलं जातं. कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये अशी दत्तक देण्याची सुविधा आहे. या श्वानांना नंबर आणि नावाने ओळखले जाते. या श्वानांची बुद्धी क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. त्यानुसारच हे श्वान वेगवेगळ्या कामांमध्ये तरबेज असतात. त्यांच्या योग्यतेनुसारच त्यांची ड्युटी लावली जाते.पोलीस विभागाद्वारे श्वानांना देशाच्या सेवे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी पण मदत घेतली जाते. सैन्यामध्ये माणसांबरोबर हे श्वान देखील देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. अनेकदा कुत्र्याने स्वतःच्या प्राणांचे त्याग करून एखाद्या सैनिकांचे प्राण वाचवले आहे. सैन्यामध्ये ह्यांचे कार्य बॉम्ब, दारुगोळे आणि दहशतवादींचे ठिकाणांचा शोध करण्यात सैन्याची मदत करणे आहे. अश्या प्रकारे ते देशाच्या कामीपण येतात आणि सैन्याची मदत करतात.

या कारणामुळे रिटायरमेंटनंतर मारले जातात श्वान
या श्वानांना मारण्याची प्रथा हि खूप जुनी आहे. अगदी इंग्रजाच्या काळापासून हि प्रथा सुरु असून यामध्ये सेवा पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना मारून टाकले जाते. त्याचबरोबर जर एखादे श्वान आजारी असेल तर किंवा ते व्यवस्थित काम करू शकत नसेल तर त्याला विष देऊन किंवा बंदुकीची गोळी घालून ठार केले जाते. मात्र याआधी या श्वानांना मोठ्या सन्मानाने आणि सर्व परंपरानुसार निवृत्त केले जाते. मात्र यामागे म्हणजेच या श्वानांना मारण्यामागे देखील विविध कारणे सांगितले जातात. यामधील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांना सेनेच्या सर्व लोकेशन संपूर्ण माहिती असते. सोबतच इतर गोपनीय माहितीही त्यांना असते. अशात जर त्यांना एखाद्या सामान्य व्यक्तीकडे सोपवलं तर हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. त्याचबरोबर जर या श्वानांना एनिमन वेलफेअर सोसायटी किंवा कोणत्या खाजगी हातांमध्ये दिलं तर ते त्या श्वानांना तशा सुविधा देऊ शकत नाहीत जशा त्यांना सेनेत मिळतात. सेनेतील श्वानांना विशेष सुविधा दिल्या जाता. श्वानांसोबतच हॅंडलर्सचं ट्रेनिंगही होतं. श्वानांचं ट्रेनिंग ते ६ ते ९ महिन्यांचे असतात तेव्हापासून सुरू होते. त्यामुळे हे श्वान एक प्रकारे राजेशाही जीवन जगत असते. मात्र रिटायर झाल्यानंतर त्याला दुसऱ्याला दिले तर ते त्याला तसे ठेवू शकत नाहीत.

आर्मीमधील सर्वच श्वानांना ट्रेकर ट्रेनिंग, एक्सप्लोसिव्स डिटेक्शन, सर्च अॅन्ड रेस्क्यू इत्यादी कोर्स शिकवले जातात. ट्रेनिंगदरम्यान हॅंडलरला सुट्टी दिली जात नाही. ट्रेनिंगनंतर श्वान आणि हॅंडलरची परीक्षा घेतली जाते. जर रिझल्ट योग्य आला नाही तर त्यांच्या ट्रेनिंग कालावधी वाढवला जातो. त्याचबरोबर प्रत्येक श्वानासाठी वेगळा ट्रेनर ठेवलेला असतो. त्यामुळे त्या ट्रेनरला त्याच श्वानाकडे लक्ष ठेवायचे असते. या सर्व श्वानांना ट्रेनिंग देण्यासाठी भारतात विशेष ठिकाणीच हि ट्रेनिंग सेंटर आहेत. आर्मी किंवा इतर संस्था श्वानांना नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स, टेकनपूर, मेरठ येथील रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स, नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स अॅन्ड एनिमल्स, चंडीगढ येथून घेतात. इथे श्वानांना ट्रेनिंग दिलं जातं. या ठिकाणी या श्वानांची ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढले जाते. या ठिकाणी येण्याआधी या श्वानांची किंमत २० ते ३५ हजार रूपये असते. पण तयार झाल्यावर त्यांची किंमत २ ते ३ लाख रूपये होते.त्यामुळे या ठिकाणी ट्रेनिंग आल्यानंतर त्याची किंमत आपोआप वाढते.

मात्र या ठिकाणी असणाऱ्या श्वानांच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या हॅडलर्सना आणि श्वानांना वेगवेगळे सन्मान दिले जातात. तसेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी आणखी वेगळे सन्मान दिले जातात. देशासाठी सेवा बजावणारे ते एक प्रकारचे भारतीय सैनिकच असतात. त्यामुळे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचे महत्व देखील कमी नाही. त्यामुळे त्यांना सैन्यामध्ये विशेष स्थान असते. मात्र या श्वानांमध्ये कोणत्याही जातीच्या श्वानांचा समावेश होत नाही. यासाठी विशिष्ट जातीच्या श्वानांचीच निवड केली जाते. या श्वानांमध्ये लेब्राडोर, जर्मन शेफर्ड, डाबरमॅन, कोकर स्पाइनल आणि बेल्जिअम शेफर्ड प्रजातीच्या श्वानांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे या श्वानांची किंमत देखील फार असते. त्यामुळे आणि जवळपास सर्वच श्वान हे विदेशी जातीचे असल्याने त्यांची किंमत फार वाढते.

दरम्यान, श्वानांना मारण्याची ही प्रथा बंद करण्याची विनंती काही संस्थांनी केली होती. यावर सरकारने देखील पॉलिसी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय सैन्यात भारतीय प्रजातीच्या श्वानांचा समावेश करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता यापुढे कदाचित भारतीय सैन्यात आपल्याला भारतीय प्रजातीचे श्वान देखील पाहायला मिळू शकतात.