Articles Education Featured

सरकारी खजिन्यातून चोरी केले ४० रुपये: मात्र आता होणार जबर शिक्षा, वाचून तुम्हाला बसेल धक्का

jail
jail

सरकारी खजिन्यावर हात घातल्यानंतर आपल्याला माहित आहे कि, कडक शिक्षा हि होतेच. मात्र भारतात असे अनेक उदयॊगपती आहेत ज्यांनी करोडो रुपयांचे कर्ज घेऊन देशातून पोबारा केलेला आहे. मात्र आजपर्यंत त्यांनी बँकांचे कर्ज परत केलेले नाही. मात्र महाराष्ट्रात एक अशी घटना घडली आहे ज्याने तुमचे डोके चक्रावून जाईल. आजच्या लेखात आम्ही याच व्यक्तीची गोष्ट सांगणार असून या व्यक्तीने भारताच्या नाणी छापण्याच्या कारखान्यातून २ शिक्क्यांची चोरी केली होती. मात्र आता त्याच्या या चोरीची त्याला मोठी शिक्षा भोगायला लागू शकते. या व्यक्तीने याची चोरी केल्यानंतर गेला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला या प्रकरणात ७ वर्षांची मोठी शिक्षा देखील होऊ शकते.

भारत सरकारच्या छापखान्यातून चोरी
या व्यक्तीने हि चोरी भारत सरकारच्या छापखान्यातून चोरी केली होती. हा व्यक्ती त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करत होता. मात्र त्याने या ठिकाणी काम करताना २० रुपयांच्या दोन शिक्यांची चोरी केली होती. मात्र या व्यक्तीने चोरी केलेली हि नाणी अजूनपर्यंत अधिकृत रीत्या बाजारात आलेली नसून या व्यक्तीने याआधीच याची चोरी केली आहे.

अशा प्रकारे पकडला गेला
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यॉरिटी फोर्केस इंस्पेक्टर समशेर सज्जुराम हे यावेळी छापखान्यात सुरक्षेसाठी तैनात होते. त्यावेळी या चोरीची कल्पना सर्वात पहिले त्यांना आली. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीचे लॉकर तपासले असता त्या व्यक्तीच्या लॉकरमध्ये हे दोन शिक्के आढळून आले. त्यानंतर या व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सात वर्षांची होऊ शकते शिक्षा
या प्रकरणी या व्यक्तीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर या व्यक्तीने छापखान्यातून दोन नाण्यांची चोरी केली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींची कडक चौकशी होत असते. त्यामुळे त्याने चोरी केलेली हि नाणी आपल्या लॉकरमध्ये लपवली होती. मात्र त्यानंतर त्याचे लॉकर तपासले असता त्यामध्ये हे दोन शिक्के आढळून आले. त्यानंतर या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या अनुसार विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या व्यक्तीने स्पष्टीकरण देताना सांगितले कि, त्याने हि चोरी जिज्ञासा म्हणून केली होती ना कि धन कमावण्यासाठी. या प्रकरणात या व्यक्तीवर केवळ गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. कोरोना व्हायरसच्या या संकटामुळे त्या व्यक्तीला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणात सहकार्य करण्याची नोटीस त्याला बजावण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये येणार होती नाणी बाजारात
चोरी करण्यात आलेले हे शिक्के एप्रिल महिन्यात बाजारात येणार होते. सरकारने याची तयारी देखील सुरु केली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हि नाणी या काळात बाजारात आणता आली नाही. हि २० रुपयांची नाणी दिसायला १० रुपयांच्या नाण्यासारखीच आहेत. यामध्ये ६५ टक्के कॉपर, १५ टक्के झिंक आणि १० टक्के निकोल वापरण्यात आले आहे. कोरोनाचे हे संकट देशभरातून गेल्यानंतर हि नाणी बाजारात आणण्याची सरकारची योजना आहे.

संपूर्ण देशभरात सरकारचे चार छापखाने असून मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा मध्ये आहेत. याठिकाणी केवळ नाण्यांची छपाई केली नोटा वेगळ्या ठिकाणी छापल्या जातात. या ठिकाणी नाणी तयार करण्याबरोबरच सरंक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कार्यांसाठी देण्यात येणारे मेडल्स देखील बनवण्यात येतात.

भारतात नोटा कुठे छापल्या जातात?

भारतात ‘रुपया’ या शब्दाचा वापर सर्वांत पहिल्यांदा शेरशाह सूरीने त्याच्या शासनकाळात केला होता. भारतात नोट छापण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँक आणि शिक्के बनविण्याचे काम भारत सरकार करते. देशात सर्वांत पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होता. वर्तमानकाळात भारतासह ८ देशांमध्ये मुद्राला ‘रुपया’ असे म्हटले जाते. भारतीय नोटांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेशिवाय इतर १५ भाषांचा वापर होतो.

देशात नोटा छापण्यासाठी ४ बँक नोट प्रेस, चार टांकसाळ आणि एक पेपर मिल आहेत. नोट प्रेस मध्य प्रदेशमधील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, पश्चिम बंगालमधील सालबोनी आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे आहे. चलन प्रेस नोट नाशिक : येथे १९९१ पासून १, २, ५, १०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांची छपाई होते. सर्वांत आधी येथे ५० आणि १०० रुपयांच्या नोटांची छपाई होत होती. देवास प्रेस नोट : येथे वर्षभरात २६५ कोटी रुपयांच्या नोटा छापल्या जातात. यामध्ये २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देवासमध्ये नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचीही निर्मिती केली जाते. मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे सिक्युरिटी पेपर मिल आहे. नोट छपाईचे पेपर होशंगाबाद आणि विदेशातून येतात. १००० रुपयांचे नोट म्हैसूर येथे छापले जातात.