Actors Articles Bollywood Entertainment Movies News

फक्त एका जाहिरातीसाठी 11 कोटी घेतो ‘हा’ अभिनेता : जाऊन घ्या कोण आहे का ?

srk-aamir-sal
srk-aamir-sal

आपण अनेकदा बॉलिवूड सुपरस्टार वस्तूंच्या जाहिराती करताना पाहतो. मात्र एका जाहिरातीसाठी हे स्टार्स किती पैसे घेतात याची तुम्हाला माहिती आहे का ? आपण अनेकदा या जाहिराती पाहतो आणि सोडून देतो, मात्र हे बॉलिवूड स्टार्स एक जाहिरात करण्यासाठी करोडो रुपये घेत असतात.

या यादीमध्ये अभिनेता अमीर खान हा सर्वात वर असून तो एका जाहिरातीसाठी 11 कोटी रुपये मानधन घेतो. त्याच्याखालोखाल शाहरुख खान हा एका जाहिरातीसाठी 9 कोटी रुपये मानधन घेत असून अमिताभ बच्चन एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेतात. तर सलमान खान एका जाहिरातीसाठी 7 कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार हा एका जाहिरातीसाठी 7 कोटी रुपये घेतो.

vicky kaushal
vicky kaushal

तर नवोदित अभिनेत्यांमध्ये विकी कौशल हा 3 कोटी रुपये, टायगर श्रॉफ हा अडीच कोटी रुपये तर राजकुमार राव हा दीड कोटी रुपये मानधन घेतो. नवीन चेहऱ्यांमध्ये विकी कौशल याला मोठी मागणी असून त्याच्या अभिनय क्षमतेमुळे आणि तरुणांमध्ये असणाऱ्या लोकप्रियतेमुळे जाहिरात क्षेत्रात त्याला मोठी मागणी आहे.

उरी चित्रपटाच्या यशानंतर त्याला जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात साइन करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात यश मिळवल्यानंतर देखील त्याचे पाय जामिनावर असल्याने त्याला मोठी मागणी आहे.