Articles

या गोष्टीकडे पुरुष होतात जास्त आकर्षक…!!

Being Maharashtrian
Being Maharashtrian

सध्याच्या काळात महिलांमध्ये बॅकलेस ड्रेस परिधान करण्याची एक वेगळीच फॅशन चालू झाली आहे. महिलांमध्ये बॅकलेसची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच महिला आणि तरुणी आपल्या चेह-याची सुंदरता वाढविण्याकडेही खुप लक्ष देतात.

पण आपल्या पाठीकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे पाठ काळपट पडण्यास सुरुवात होते. पाठ काळपट पडल्यामुळे बॅकलेस ड्रेस परिधान करण्याची फॅशन अनेकांना टाळावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमची पाठ खुपच आकर्षक आणि सुंदर बनवू शकाल.

चला तर मग पाहूयात काय आहेत या खास टिप्स… दररोज आंघोळ केल्यानंतर आपल्या पाठीवर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर जरुर लावावे पाठीवर काळे डाग पडले असल्यास त्यावर चंदन, आंबेहळद आणि जायफळ उगाळून लावावे

आपली पाठ सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी पाठीची मसाज करावी दररोज आंघोळ करताना आपली पाठ चांगल्या प्रकारे घासून साफ करावी, पाठ स्वच्छ करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये हँडल असलेला ब्रशही उपलब्ध आहेत.

त्याच्या सहाय्याने अगदी सहजच पाठ साफ आणि स्वच्छ करता येईल  जर पाठीवर खुपच काळे डाग पडले असतील तर हळद आणि लिंबू एकत्र करुन ते मिश्रण लावावे. हे मिश्रण दररोज पाठीवर लावल्यास त्वचेवर चमकदारपणा येईल..