Articles Food Food & Drink

पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला ,माहीत आहेत का ?

पाणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. पानी म्हणजे जीवन ,पानी म्हणजे सर्व काही ,कोणताही मनुष्य असो किंवा प्राणी  सर्वांसाठी पानी खूप महत्वपूर्ण आहे. पानी म्हणजे जीवनच उन्हाळा असो किंवा इतर कोणताही ऋतु पाणी हे प्यालाच हवे. पानी आपली तहान भागावते.  पानी कमी पिले अनेकांना खूप त्रास होतो. गरोदर महिला आणि वृद्ध माणसांनी जास्तीत -जास्त पानी प्यावे. पाणी पिण्याचे कोणतेच तोटे नाहीत परंतु पानी न पिण्याचे खूप तोटे व दुष्परिणाम देखील आहेत. त्यामूळे सतत पानी पित राहावे. आज आपन पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाण्याची मदत होते. शरीरातील दोन टक्के पाणी कमी झाले तरी पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. व्यायामामधून घाम येऊन शरीरातील पाणी कमी होत असते. खेळाडूंनी हे लक्षात ठेवून जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी कमी प्यायल्यास त्यांना व्यायाम करते वेळी थकवा येणे, शरीरातील तापमान नियंत्रण न होणे आदी त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातील सर्व स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्केअसते. शारीरिकदृष्टय़ा जास्त थकवणारे व्यायाम करताना स्नायूंमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी शरीरामध्ये पाणी मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर- वाढलेले वजन ही एक मोठी समस्या आहे. वजन कमी करणे ही एक  मोठे आव्हान आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात पण पाणी पिणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. तुम्ही भरपूर पानी प्या आणि अवघ्या सात  दिवसात वजन कमी करा. रोज तुम्ही भरपूर पानी प्यायला हवे ,कारण पानी पील्यामुळे वजन कमी होते ,मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात. पाणी पिले तर तुम्ही 8 किलो मीटर जॉगिंग करण्याबरोबर आहे. त्यामुळे भरपूर पानी प्या आणि वजन कमी करा . हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पाणी पिण्याचे कोणतेच दुष्परिणाम नाहीत त्यामुळे आपण जास्तीत जास्त पानी प्यायला हवे.

दिवसभर रहा प्रसन्न आणि आनंदी – भरपूर पाणी पील्यामुळे शरीरातील मेटाबोलीजम वाढते. दिवसभर तुम्हाला प्रसन्न आणि उत्साही वाटेल,या बरोबरच काम  करण्यासाठी एक वेगळ्या प्रकरचीच ऊर्जा मिळेल. जर तुम्ही रोज सकाळी पाणी पिला  तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते कारण सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात मेटाबोलीजम वाढते. त्यामुळे अधिक अधिक पाणी प्या आणि दिवसभर प्रसन्न रहा. अनेकांना पुरेशी झोपू होऊन देखील सकाळी उठल्या बरोबर थकवा जाणवतो ,त्यामुळे अशा  लोकांनी तर जास्तीत जास्त पाणी प्यावे.

एकाग्रता वाढवा – कोणतेही काम करण्यासाठी एकाग्रता खूप महत्वाची असते. जसे की अभ्यास असो किंवा कोणतेही काम एकाग्रता  वाढविण्यासाठी पाणी पिणे हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण आपल्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. जवळपास आपल्या मेंदूमध्ये 75 ते 80 टक्के पाणी आहे. जर तुम्ही भरपूर  पाणी पिले तर  तुमची एकाग्रता वाढेल आणि कोणतेही काम तुम्ही उत्तम रीतीने करू शकता. त्यामुळे जर तुम्हला बौद्धिक विकास उत्तम रीतीने करायचा असेल तर भरपूर पाणी प्या.

ओव्हर ईटिंगसाठी उपयुक्त – वजन वाढण्यासाठी सगळ्यात चुकीची सवय म्हणजे ओवर ईटिंग म्हणजेच सतत खात राहणे. आपण काहीना काही खात राहत असतो. त्यामुळे आपले अनेकदा वजन वाढते. ओव्हर ईटिंग टाळण्यासाठी पाणी पिणे हा  सर्वात उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही भरपूर पाणी प्यायला तर तुम्हाला भूक लागणार नाही. पाणी पील्यामुळे आपल्या पोटात जागा राहत नाही व आपल्याला जास्तीत जास्त भूक लागत नाही. पोट गच्च झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ओव्हर ईटिंग टाळण्यासाठी  तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता.

शरीरावर आणि आरोग्यावर ‘पाणीपिणे फायदेशीर – पाणी हा एक तरल पदार्थ आहे. त्यामुळे पाणी पील्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक  विषारी पदार्थ शरीरा बाहेर वेळो -वेळी टाकले जातात. त्यामुळे शरीराला त्याचा खूप फायदा होतो. तुमचे शारीरक स्वास्थ्य चांगले राहते. तुमचे मानसिक स्वास्थ देखील उत्तम राहते. त्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्यायला  हवे. रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.

अनेक अजरांपासून राहत दूर – पानी जास्त व व्यवस्थित जर प्याले तर तुम्हाला कोणताच त्रास होत नाही. जर तुम्ही कमी पानी पिला तर तुम्हाला किडनी संबंधी आजार देखील होऊ शकतो . हायपर टेंशन , मूत्राशयांचा आजार देखील होऊ शकतो. त्यामुळे भरपूर पानी प्यावे आणि आनंदी राहावे. पाणी प्यायल्यामुळे आपन  अनेक समस्यांपासून दूर राहतो.

हार्ट अटॅकच्या शक्यता कमी करते – हदयाला चांगल्या प्रकारे काम  करण्यासाठी पाणी अतिशय महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही रोज पानी प्याला तर तुम्ही नक्कीच निरोगी राहाल. कारण पाणी तुमच्या  हार्ट अटॅकच्या शक्यतेला 41  टक्के कमी करते. त्यामुळे  जे लोक भरपूर पाणी पितात त्याचे हदय चांगले राहते. झोपण्यापूर्वी काही मिनिटांआधी पाणी पिण्याने मूड चांगला राहण्याला मदत होते आणि झोप पण चांगली येते. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे. झोपण्यापूर्वी थोडे गरम पाणी प्यायले  तर रात्रभर शरीरतले पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहाते.  पाणी पिण्याचे एवढे सगळे फायदे माहीत झाल्यावर दिवसाला 10-12 ग्लास पिणे गरजेचे आहे. पाणी पाण्यामुळे अनेक समस्या टळतातच आणि विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात पाणी माणसाला उत्साही ठेवायला मदत करते.
अनेकजण  पाणी प्यायला  कंटाळा करतात. काही लोकांना तर पाणी पिण्याची आठवण करूण  द्यावी  लागते. परंतु आपल्या  चंगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे.