Articles Featured Food Food & Drink

छोट्याश्या विलायचीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

भारताचे मसाले संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. या मसाल्यांच्या  पदार्थांना देश – विदेशातून मोठ्या प्रमाणात  मागणी आहे.
आपन जायफळ , लवंग , विलायची , दगफुल  यासारखे कित्येक मसाल्याचे पदार्थ वापरतो. त्यातील अनेक पदार्थांचा  आपल्याला सर्व उपयोग माहीत असतो. काही पदार्थ तिखट असतात ते पदार्थ तिखट करतात. काहींचा स्वाद चांगला असतो , तर काही पदार्थ पदार्थाचा सुगंध वाढवतात. विलायची हा असाच एक पदार्थ आहे , जो पदार्थाची चव वाढवतोच ,पण या बरोबरच पदार्थाला एक वेगळाच सुगंध देखील येतो. पण विलायचीचे हे फायदे इतक्या पर्यंतच  मर्यादित नाहीत , त्याचे सौन्दर्य व आरोग्यासाठी देखील  अनेक फायदे आहेत आज या लेखात ते सविस्तर जाणून घेणार आहोत.

त्वचेला आणते एक वेगळाच  निखार – मूल किंवा मुली जेव्हा वयात येतात ,तेव्हा त्याच्यामध्ये अनेक शाररीक व मानसिक बदल होत असतात. तेव्हा हे सर्व बदल आपल्याला चेहऱ्यावर दिसून येतात. चेहऱ्यावर फोड येणे , पिंपप्लस येणे , काळे डाग पडणे अशा अनेक समस्या सतावत असतात. या सर्व समस्येवर एक योग्य उपाय म्हणजे विलायची होय. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पानी व विलायची खावी यामुळे खूप चांगला फायदा होतो. विलायचीमुळे चेहऱ्यांवरील सर्व डाग – धब्बे निघून जातात.

पोटासंबंधी काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. जसे की पोट गच्च होणे , खराब होणे  गॅस होणे या सारख्या पोटाच्या अनेक तक्रारी आपल्याला सतत येत असतात , अशा वेळेस रोज सकाळी गरम पाणी व एक विलायची खावी. यामुळे देखील खूप फरक पडतो. अनेकांचे चुकीच्या खाण्याच्या पद्धती , चुकीची दिनचर्या यामुळे खूप केस गळतात यासाठी देखील विलायची अतिशय उपयुक्त आहे. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी व एक विलायची खावी.  केस गळण्याचे कमी होतील. वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.

अनेकांना रात्री झोप येत नाही किंवा  झोपताना खूप घोरल्याचा आवाज येतो अशा लोकांसाठी विलायची खूप उपयुक्त आहे. रोज रात्री झोपण्या[पूर्वी एक विलायची गरम पाण्यासोबत खावी. त्यामुळे घोरणे देखील कमी  होते व अनेकांना रात्री झोप देखील येत नाही. अशा लोकांना विलायचीमुळे चांगली झोप येते व घोरण्याचा आवाज देखील येत नाही.  वेलचीत अॅन्टी बॅक्टिरियल गुण असतो. त्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.

वेलची पित्तावर रामबाण उपाय आहे. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असं असलं तरीही वेलचीमुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते. अन्न पचण्यासाठी वेलची मदत करते.विलायची-अद्रक टाकलेला सकाळचा चहा असो किंवा रात्रीच्या जेवणातील चविष्ट खीर. या सर्व पदार्थांना सुगंध आणि चव देण्याचे काम विलायची करते. परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की, विलायचीचे सेवन तुमची सेक्स पॉवर वाढवण्यासही सक्षम आहे.तुमचा स्पर्म काउंट कमी असेल तर हा उपाय रामबाण ठरेल. विलायची खाऊन गरम पाणी पिल्याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.

विलायची खाल्ल्यास कफ बाहेर पडतो. सर्दी, खोकला किवा छातीमध्ये कफ असेल तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी विलायची उत्तम नैसर्गिक उपचार आहे. जर तुम्हाला सर्दीचा खूप त्रास असेल तर गरम पाण्यामध्ये विलायची तेलाचे काही थेंब टाकून वाफ घेतल्यास आराम मिळेल.विलायची अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी संबधित आजारांमध्ये लाभकारी आहे. आयुर्वेदामध्ये विलायचीला एक गरम मसाला मानले जाते. विलायची शरीराला आतून गरम ठेवते. एक ग्लास गरम दुधामध्ये एक-दोन चिमुटभर विलायची पावडर आणि हळद टाका. चवीनुसार साखर टाकू शकता. अ‍ॅनिमियाची लक्षणं आणि कमजोरीपासून दूर राहण्यासाठी दररोज रात्री हे दुध प्यावे.