Articles Featured

हिंदू संस्कृतीत बांबू का जाळत नाहीत यामगि धार्मिक व वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का ?


 भारतीय संस्कृतिला खूप प्राचीन इतिहास लाभलेला आहे. भारतातील प्रत्येक सण . उत्सव आणि रिती रिवाज यामागे खूप अर्थ दडलेला असतो. आपले पूर्वज हे खूप हुशार होते. त्यांचा अनेक विषयांवर खूप चांगला अभ्यास होता. आज हजारो वर्षापूर्वी केलेल्या गोष्टी जग आता कोठे मान्य करीत आहे. आपल्याला आपल्या माहितचा सण , उत्सव यांचा अभिमान असायला हवा. आपल्याला अनेक गोष्टी का करतोच हे माहीत नसत हे करण्याआधीच आपण त्यातील चुका काढतो , आणि नांव ठेवतो पण जेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार सर्व बाजूने करतो. त्यातील वैज्ञानिक  दृष्टिकोण पाहतो तेव्हा ती गोष्ट  स्वीकारतो. जसे की आपले पूर्वज म्हणत बांबूचे  झाड किंवा लाकूड  जाळू नये. आपण विचार करतो का ? हे असे का म्हटले जाते , या मागे काही कारण आहे का ? याचा आपण कधीच पूर्ण विचार करत नाहीत आज आपण जाणून घेणार आहोत. बांबूचे लाकूड का जाळत नाहीत. त्या मागील धार्मिक आणि वैज्ञानिक  कारण.

धार्मिक कारण – शास्त्रानुसार बांबूच्या लाकडाला जाळण्यास मनाई आहे. बांबू कोणत्याही हवन किंवा पूजामध्ये जळत नाही. भारतीय सनातन परंपरेनुसार असे म्हटले जाते की बांबूची लाकडे जाळल्याने वंशाचा विनाश होतो आणि पितृदोष लागतो.भारतीय वास्तुविज्ञानानुसार बांबूला शुभ मानले जाते. लग्नात, मुंज, मूडनं वगैरेमध्ये बांबूची पूजा आणि बांबूचे मंडपही बनविली जातात, त्यामुळे बांबूलाजाळत नाही.जेव्हा बाळ जन्माला तेव्हा त्याला आणि आईला जोडणारी नाळ देखील बांबूच्या झाडाखाली पुरतात असे मानले जाते की त्यामुळे घराण्याचा वंश वाढत राहतो.

शास्त्रीय कारण – बांबू मध्ये शिसे आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचे आणि शिस्याचे ओक्सिडेशन होऊन लीड ऑक्सआईड आणि हेवी मेटल चे ऑक्सआईड बनतात .हे ऑक्सआईड निरो टॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेला खूप घातक असतात. अगरबत्ती मध्ये सुगंधासाठी phthalate नावाच्या एकाविशीष्ट रसायनाचा वापर होतो जे Phtalic ऍसिड च एक इस्टर आहे.बांबूच्या लाकडामध्ये शिसे आणि इतर अनेक प्रकारच्या धातू असतात. बांबू जळल्याने या धातू त्यांचे ऑक्साइड तयार करतात, ज्यामुळे वातावरण दूषित होते. ते जाळणे इतके धोकादायक आहे की ते आपले जीव देखील घेऊ शकतात, कारण त्याचे भाग हवेमध्ये विरघळतात आणि जेव्हा आपण श्वास घेतोतेव्हा ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे न्यूरो आणि यकृत समस्येचा धोका देखील वाढतो.hepatotoxic रसायनाची थोडी मात्र सुध्या यकृतासाठी (लिव्हर ) घातक असते. शास्त्रामध्ये सगळ्यठिकाणी धूप हाच शब्दप्रयोग केलेला आहे पूजेमध्ये धूप दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो…

तुम्हाला माहीत आहे का , तुम्ही जो बांबू कधीही जाळत नाहीत तो बांबू  लोकांचा कंजूस व निष्काळजीपणा अन कंपन्यांच्या नफा कमवायच्या कारणामुळे उदबत्ती बनवतांना बांबू वापरले जाते.अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित असेलच. हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधा बरोबर श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते.अश्याप्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा नुरोटॉक्सिक आणि hepatotoxic रसायने शरीरात पोहोचवतो. हे रसायने कर्करोग आणि पक्षाघाता सारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत .उदबत्ती बांबू आणि केमिकलपासून बनविली जाते ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.उदबत्ती येवजी तुम्ही धूप कांडी वापरत जा ,त्यामुळे आरोग्यास कोणतेच त्रास होत नाहीत.अगरबतीचा वापर कधीपासून सुरू झाला – भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा इस्लामच्या आगमना नंतर आढळतो . इस्लाम मध्ये मूर्तिपूजा केली जात नाही तिथे अगरबत्ती हि मजार वर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात लावतो.