Articles Featured Food Food & Drink

साखर खाण्याचे हे भयानक तोटे तुम्हाला माहीत आहेत का ?

साखरेला  शेतकरी पांढर सोनं म्हणून ओळखतो. जवळपास आपण सर्व पदार्थात साखरच वापरतो. परंतु तुम्हाला साखर खाण्याचे हे तोटे माहीत आहेत का ? जगभरात रोज लोक साखर खाऊन ५०० कॅलरीज वाढवतात. जे लोक जास्त प्रमाणात साखर खातात ,त्यांना दहा टक्के अधिक हदय विकरांच्या झटक्याची शक्यता असते.  एका अभ्यासातून असे देखील समोर आले आहे , मेंदूतील कोशिकांवर साखर खाण्याचा थेट परिणाम होते. मेंदूतील  कोशिकांची उत्पाती  कमी होते. त्या लवकर वृद्ध होतात. ज्या  लोकांना  डायबीटीज व ज्यांचे वजन अधिक असते अशा लोकांना साखरेमुळे अधिक त्रास होतो. एका अभ्यासातून असे देखील समोर आले आहे , की कोकेनपेक्षा साखर सात पट अधिक हानिकारक असते. काही लोकांना तर सारखरेचे इतकी जास्त सवय लागते की ते लोक सतत साखर खातात.  साखर तुम्ही जितकी जास्त खातात , तितकी ती जास्त खाण्याची इच्छा तुम्हाला अधिक होते.  नियमित व्यायाम व साखरेचे योग्य प्रमाण जर ठेवले तर तुम्ही निरोगी राहू शकता.

साखर म्हणजे नेमक काय ?
साखर ही कार्बोहाइड्रेट या पासून बनलेली आहे. सामान्यता साखर ही  मोनोसैक्कैराइड   जसे की  ग्लूकोज, फ्रक्टोज व गैलेक्टोज या पासून बनलेली आहे. या बरोबर सूक्रोज, माल्टोज व लैक्टोज या सारख्या जटिल संरचना यापासून  बनलेले आहे. ग्लूकोज जे समान्यता  आपल्याला नैसर्गिक रित्याच मिळते जसे की झाडे , फुले आणि फळे यापासून जेव्हा ग्लूकोज  आपल्या शरीरात जाते तेव्हा  ते  उर्जेमध्ये परिवर्तीत होते. फ्रक्टोज  म्हणजे काय तर फ्रूट साखर फळांच्या गोडव्यातून जी साखर मिळते त्यास फ्रक्टोज  म्हणतात. फ्रक्टोज  हे  उस आणि मधात देखील असते. सूक्रोज हे ऊसाच्या मुळाशी सापडते. हे ग्लुकोज सोबत देखील सापडते. लैक्टोज: हे दुध आणि दुधाच्या पदार्थात सापडते. यामध्ये साखरेचे प्रमाण देखील अधिक असते. पांढऱ्या साखरेच रिफायनड शुगर देखील म्हणतात,कारण यामध्ये सल्फर डायऑक्साइड फॉस्फरीक अॅसिड  फॉस्फोरिक एसिड, कैल्शियम हाइड्रॉक्साइड आणि  एक्टिवेटेड कार्बन रीफायनिंग नंतर यामधील उपलब्ध असलेले  विटामिन, मिनरल, प्रोटीन व एंजाइम्स नष्ट होतात. फक्त सुकरोज उपलब्ध राहते.आणि ते शरीरासाठी हानिकारक असते.  साखर जर जास्त प्रमाणात खाल्ली तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, इंसुलिन रेजिस्टेंस आणि हाई ब्लड प्रेशर होते . साखरेचे जर अतिसेवन केले तर शरीरावर आणि विशेषता पोटावर मोठ्या प्रमाणात चरबी जमा होते. त्यामुळे तुमचे अतिरिक्त वजन वाढते. जे शरीरासाठी जास्त हानिकारक असते. त्यामुळे अनेक आजार उद्धभवतात.

दात किडणे , डायबीटीज , प्रतिकार शक्ति कमी होणे अशा समस्या उद्धभवतात. साखर तुमच्या शरीरातील कैल्शियम शोषून घेते ,त्यामुळे केस गळणे , हाडे दुखणे अशा अनेक समस्या उद्धभवतात. साखर जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास त्याचा परिणाम पचन तंत्रावर देखील होतो.  साखरेचे जर जास्त सेवन केले तर विटामीन बी देखील मोठ्या प्रमाणात कमी होते. साखर जर जास्त प्रमाणात शरीरात गेली तर शरीरातील इंसुलिन चा  स्तर वाढतो , ज्यामुळे कैंसरग्रस्त ट्यूमर ची शक्यता अधिक वाढते. साधारणपणे आपल्या शरिराला रोज जास्तीत जास्त एक ते दिड चमचा साखरेची गरज असते.

आपल्या शरीरातली साठवलेली फॅटरुपी उर्जा वापरली जात नाहीच. आणि मग पोट सारखं भूक भूक करत राहतं. आपण सारखं येताजाता काहीतरी खात राहतो. शक्यतो हे अरबटचरबट, येताजाता खाणे प्रोसेस्ड फूड म्हणजे फॅक्टरीत तयार केलेले अन्नपदार्थच असतात. ज्यात परत भरपूर साखर+कार्बोहायड्रेट्स असतेच. त्यात फूडइन्डस्ट्रीचे स्वतःचे फायदे आहेत. साखर ही अ‍ॅडिक्टीव आहे. ती व्यसनी करते. साखरेच्या अतिसेवनामुळे शरिरात बदल घडत जातात. वजन तर वाढतेच पण उत्साह राहत नाही. काही व्यायाम किंव इतर शारिरीक कष्ट करायची इच्छा होत नाही. केवळ बसून राहून कामे करत राहावीशी वाटतात. अनेकांना आपले वाढते शरीर आवडत नाही, त्यासाठी ते व्यायामाचा कष्टपूर्वक मार्ग अवलंबतातही. पण शरीरासोबत मेंदूतही रासायनिक बदल घडून आल्यामुळे व्यायामाच्या रुटीनला आत्मसात करायला प्रचंड वेळ आणि प्रयत्न लागतात. प्रोटीन्स जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव साखरेमध्ये असतो, तर यामध्ये फक्त काबरेहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात व त्यामधून फक्त शरीराला उष्मांक (कॅलरीज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे साखरेतून शरीराचे पोषण अजिबात होत नाही. फक्त आजारी असताना उदा :- जुलाब होणे, शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे. अशा वेळी शरीरातील मांसपेशींना साखरेतील काबरेहायड्रेट्समुळे शक्ती प्राप्त होते, म्हणून अशा आत्यंतिक अवस्थेत साखर-पाणी रुग्णाला पिण्यास देतात. अशा वेळी साखर सहजतेने व त्वरेने रक्तात शोषली गेल्यामुळे रुग्णाला पटकन आराम वाटतो.

साखरेऐवजी प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवताना लाल गुळाचा वापर करावा, पिवळा गुळ वापरू नये, गुळाचा रंग पिवळा करण्यासाठीही रसायनांचा वापर करतात. कॉस्टिक सोडय़ाने काकवी धुऊन काढतात व त्यामुळे पिवळा गूळ हानीकारक आहे. लाल गुळामध्ये लोह, खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. म्हणून िलबू-गूळ-सरबत, गुळाचा चहा, पुरणपोळी, गुळाचा शिरा, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्की, लाडू असे विविध गुळाचे पदार्थ खावेत. त्याचबरोबर साखरेऐवजी काकवीचा वापर करावा.साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण, रासायनिक विषारी पदार्थाचा माराच इतका असतो की, साखरेला कीड कधीच लागू शकत नाही; परंतु या सर्व प्रक्रियांमुळे साखर आपल्या शरीराला त्रासदायक ठरते. कारण, त्यातील मौल्यवान घटक साखर बनवताना नष्ट होतात.पिवळा गुळ वापरू नये, गुळाचा रंग पिवळा करण्यासाठीही रसायनांचा वापर करतात. कॉस्टिक सोडय़ाने काकवी धुऊन काढतात व त्यामुळे पिवळा गूळ हानीकारक आहे. लाल गुळामध्ये लोह, खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. साखर खाऊन तात्काळ कॅलरीज मिळतात. पण त्यातुन शरीराची पोषण करणारी द्रव्ये म्हणजे प्रथिने आजिबात मिळत नाहीत. यामुळे जास्त साखर खाल्ली तर अनुत्पादक व निरुपयोगी कॅलरी पोटात जात राहतात. जास्त साखर खाऊन वजन वाढत जाण्याची शक्यता यातुनच उद्भवते. गोड सारेच चांगले लागते, तरीही ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.