Articles

पेट्रोल रेफ्रिजरेटर मध्ये ठेवल्यास त्याचा बर्फ होतो का, जाणून घ्या

मानवाने तंत्रज्ञानाचा वापर आपले आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी नवनवीन उपकरणांचा शोध लावण्यासाठी केला आहे. दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपण अनेक उपकरणांचा वापर करत असतो. या तांत्रिक उपकरणांचा वापर करणे आपले इतक्या अंगवळणी पडले आहे की त्यांच्या शिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

अगदी साधे स्वयंपाकघरातले उदाहरण द्यायचे झाले तर रेफ्रिजरेटर आजच्या काळाची गरज बनला आहे. पदार्थ जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम साठवून ठेवणे इत्यादी कारणासाठी रेफ्रिजरेटर दैनंदिन आयुष्यामध्ये वापरला जातो.

रेफ्रिजरेटर मध्ये असलेल्या कमी तापमानामुळे काही द्रवपदार्थ यामध्ये गोठण्याची सुद्धा क्षमता असते .पदार्थ गोठण्यासाठी त्याचा गोठण्याचे तापमान महत्वाचे असते कारण तितके तापमान राखले गेले तरच तो पदार्थ गोठला जाऊ शकतो. खाण्याच्या किंवा पिण्याच्या द्रव पदार्थांना गोठण्याची क्षमता रेफ्रिजरेटरमध्ये असते मात्र एखादे इंधन रेफ्रिजरेटर मध्ये ठेवले तर ते गोठेवता येऊ शकते का हा एक प्रश्न निश्चितच पडू शकतो .

बऱ्याचदा थंड हवामानामध्ये वाहनांना सुरू होण्यास वेळ लागतो या अतिथंड तापमानामध्ये निर्माण होणाऱ्या समस्येचे मूळ हे इंधनाचे या तापमानात गोठण्याशी निगडित आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. जर पेट्रोल फ्रीजमध्ये ठेवले तर त्याचा बर्फ होईल का या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत.

थंड तापमानामध्ये जरी वाहन सुरू होण्यास वेळ लागत असला तरीही फ्रिज मध्ये पेट्रोल ठेवले तर ते गोठत नाही. फ्रिजमध्ये पेट्रोल ठेवल्या गोठत नाही कारण पेट्रोलचा गोठणांक किंवा अतिशीत बिंदू हा -50 ते -60 अंश सेल्सियस इतका कमी असतो तर रेफ्रिजरेटर चे तापमान हे 0 ते -15 अंश सेल्सिअस इतके असते .त्यामुळे फ्रिजमध्ये पेट्रोलला गोठण्यासाठी आवश्यक असलेला अतिशीत बिंदू गाठता येणे शक्य नसल्यामुळे पेट्रोलचा बर्फ होत नाही.

डिझेल मध्ये असलेल्या पॅराफीनचा अतिशीत बिंदू  हा -15 ते -16 अंश सेल्सियस इतका असतो त्यामुळे डिझेल फ्रिजमध्ये गोठवून त्याचा बर्फ होऊ शकतो. ब-याचदा थंड हवामानात पेट्रोल वर चालणाऱ्या वाहनांपेक्षा डिझेल वर चालणाऱ्या वाहनांना सुरू होण्यास वेळ लागतो यामागे डिझेल गोठू शकते हे कारण असल्याचे मानले जाते.