Articles

‘हा’ आहे पैशाला दुप्पट -तिप्पट करण्याचा फॉर्म्युला : तुम्ही देखील होऊ शकता श्रीमंत

अनेकदा आपण गुंतवणूक करताना आपले पैसे किती लवकर वाढणार याची चौकशी करत असतो.ते दुप्पट, तिप्पट कधी होणार याचा आपण विचार करत असतो. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. अनेकदा आपण गुंतवणूक करताना त्यासंबंधी नियमांची माहिती घेत नाही. त्यामुळे आपली रक्कम किती लवकर वाढणार आहे याची आपल्याला व्यवस्थित माहिती मिळत नाही. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीसंबंधी काही माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून दुप्पट करू शकता.

नियम ७२
या नियमानुसार तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट कधी होणार याची माहिती मिळते. साधारणपणे तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक ७ टक्के व्याजदर मिळत असेल तर नियम ७२ प्रमाणे गुंतवणूक केल्यास ७२ ला ७ ने भागल्यास १०.२८ वर्ष म्हणजेच साधारणपणे सव्वादहा वर्षांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील.

नियम ११४
या नियमानुसार तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे तिप्पट कधी होणार याची माहिती मिळते. साधारणपणे तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक ८ टक्के व्याजदर मिळत असेल तर नियम ११४ प्रमाणे गुंतवणूक केल्यास ११४ ला ८ ने भागल्यास १४.२५ वर्ष म्हणजेच साधारणपणे सव्वाचौदा वर्षांमध्ये तुमचे पैसे तिप्पट होतील.

नियम १४४
या नियमानुसार तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे चौपट कधी होणार याची माहिती मिळते.साधारणपणे तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक ८ टक्के व्याजदर मिळत असेल तर नियम १४४ प्रमाणे गुंतवणूक केल्यास १४४ ला ८ ने भागल्यास १८ वर्ष म्हणजेच साधारणपणे अठरा वर्षांमध्ये तुमचे पैसे चौपट होतील.