Articles Featured

बायको असताना दुसरे लग्न करणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर?

Hindu Marriage Act
Hindu Marriage Act

भारतामध्ये प्राचीन काळी बहुपत्नीत्व पद्धती अस्तित्वात होती.एकापेक्षा अधिक विवाहांना समाजव्यवस्थेकडून व कायदाव्यवस्थेकडून मान्यता दिली जात होती. मात्र पहिला जोडीदार हयात असताना कायदेशीर रित्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हे 1955 साली अस्तित्वात आलेल्या हिंदू मॅरेज एक्टनुसार अवैध मानले गेले आहे. मुळात भारतीय संस्कृतीचा पाया हा कुटुंब व्यवस्था आहे व एक जोडीदार हयात असताना दुसरे लग्न करणे हे कुटुंब व्यवस्थेला व संबंधित व्यक्तीला निश्चितच हानीकारक ठरते.

2019 साली पटना उच्च न्यायालयासमोर आलेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या विवाहाला मान्यता नसल्याचे स्पष्ट केले. पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्यांदा केलेला विवाह हा अवैध मानला जातो ,व हा  कायदेशीर रित्या  गुन्हा मानला जातो.

या गुन्ह्यासाठी कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केला तर दुसऱ्या विवाहाद्वारे झालेली अपत्य मात्र  वैध मानली जातात. जर एखाद्या सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीची पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केला  आणि त्याच्यावर या गुन्ह्मासाठी कोणतीही विभागीय कारवाई झालेली नसेल तर दुसऱ्या विवाहाद्वारे झालेले अपत्यांना त्या व्यक्तीच्या पश्चात सरकारी नोकरी प्राप्त होऊ शकते.

पटना उच्च न्यायालयासमोर 2019 साली  आलेल्या या एका विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना पहिली पत्नी ह्यात असताना दुसरा विवाह वैध मानला जात नाही हे  स्पष्ट करण्यात आले.

दुसरे लग्न केल्यास किती वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते?

पहिली पत्नी ह्यात असतांना घटस्फोटा शिवाय दुसऱ्यांदा विवाह केला तर व बहुपत्नीत्व सिद्ध झाले तर अशा व्यक्तींना हिंदू विवाह अधिनियम  1955 च्या सत्तराव्या सेक्शन अंतर्गत सात वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

पहिली पत्नी जिवंत असेल मात्र जर सात वर्षांपर्यंत ही व्यक्ती दाम्पत्य जीवनामध्ये सक्रिय नसेल तर असे वैवाहिक नाते संपुष्टात आणण्यासाठी घटस्फोट घेऊन  दुसरा विवाह केला जाऊ शकतो.